टेंभूचे पाणी पोहोचले मायणी ब्रिटिश तलावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:52 AM2021-02-27T04:52:24+5:302021-02-27T04:52:24+5:30
सातारा : माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांच्या टेंभू योजनेला यश आले असून शुक्रवारी टेंभू योजनेतून पाणी मायणीच्या ब्रिटिश ...
सातारा : माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांच्या टेंभू योजनेला यश आले असून शुक्रवारी टेंभू योजनेतून पाणी मायणीच्या ब्रिटिश तलावाकडे रवाना झाले.
खटाव दुष्काळी तालुक्याच्या जवळून टेंभू योजनेचे पाणी आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या भागाला जात होते. त्यांना पाणी देण्याबद्दल दुमत नव्हते; परंतु आम्हाला पिण्यासाठी पाणी पाहिजे, ही बाब डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी शासनाकडे लावून धरली. त्यावेळी शासनाने, पाण्याचे वाटप झाले आहे, आता तुम्हाला पाणी मिळत नाही असे सांगितले. पण येळगावकर गप्प बसले नाहीत.
आम्हाला खास बाब म्हणून पिण्याचे पाणी द्या, ही मागणी तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली चंद्रकांत पाटील यांनी खास बाब म्हणून आपल्या टंचाई विभागातून सव्वापाच कोटी निधी या योजनेला मंजूर करून दिला. या योजनेत आता सोळा गावांना फायदा होणारच आहे, पण पुढे ही योजना शेतीसाठी उपयोगी होणार आहे. तसेच माहीत २४ बाय ७ ही योजना लवकरच सुरू होणार आहे.
प्रथम मायणी शिवारात आलेल्या पाण्याचे पूजन युवा नेते सचिन गुदगे यांच्याहस्ते व महिला नीता गुदगे, पल्लवी गुदगे, आशा माने, विद्या काबुगडे, सुशिला खलीपे यांच्याहस्ते नवीन आलेल्या जलाचे ओटीभरण करण्यात आले.
यावेळी सचिन गुदगे म्हणाले, ‘टेंभूच्या पाण्यासाठी आम्ही चातकाप्रमाणे वाट पाहत होतो. डॉ. दिलीपराव येळगावकर आणि आम्ही खरोखरच जोरदार लढा दिला. या लढ्याला यश आलेले पाहून समाधान वाटते. हे पाणी शेतीसाठी कसे वापरता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
या कार्यक्रमास मानसिंगराव देशमुख, उपसरपंच आनंदा शेवाळे, सुरज पाटील, जगन्नाथ भिसे, विजय कवडे, पिंटू झोडगे, आशा माने, सरपंच संपत शेवाळे, सुधाकर शिंदे, सुखदेव शिंदे, गणीभाई सारवान, तुषार भिसे, विजयराव कवडे, अंकुश निकाळजे, नंदकुमार पुस्तके, राजू ठोंबरे, विलास शिंदे, महादेव ढवळे, दत्तात्रय थोरात, मजित भाई, नदाफ गणीभाई, सारवान तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी राजूरकर कचरे यांनी आभार मानले.
कोट..
दुष्काळी जनतेला पाणी मिळावे, यासाठी अखंडपणे अभ्यासपूर्णरित्या लढा दिला आहे. टेंभूचे पाणी सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात जात होते. मात्र खटाव, माणमधील गावे तहानलेली होती. आता हे पाणी मायणी तलावात आल्याने पुरेसे पाणी मिळणार आहे. हेच पाणी आता शेतीसाठी वापरायला मिळावे, यासाठी प्रयत्न करणार आहे.
- माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर
फोटो नेम : २६मायणी
फोटो ओळ :
मायणी येथील ब्रिटिशकालीन तलावात टेंभू धरणाचे पाणी पोहोचले. सरपंच सचिन गुदगे यांच्याहस्ते या पाण्याचे पूजन करण्यात आले.