Satara: नीरा उजव्या कालव्यातून पाणी चोरी, रस्त्याच्या कामासाठी विनापरवाना उपसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:21 IST2025-03-18T17:19:46+5:302025-03-18T17:21:27+5:30
फलटण : फलटण तालुक्यात एकीकडे कडक उन्हाळा जाणवत असताना शेती व पिण्यासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. नीरा उजवा कालवामधून ...

Satara: नीरा उजव्या कालव्यातून पाणी चोरी, रस्त्याच्या कामासाठी विनापरवाना उपसा
फलटण : फलटण तालुक्यात एकीकडे कडक उन्हाळा जाणवत असताना शेती व पिण्यासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. नीरा उजवा कालवामधून विनापरवाना रस्त्याच्या कामासाठी टँकरमधून पाण्याची चोरी होत असल्याची घटना समोर आली आहे.
रविवारी (दि. १६) नाना पाटील चौक येथील पुलालगत फलटण शहरात सुरू असलेल्या एका रस्त्याच्या कामासाठी नीरा कालव्यातून चक्क मोटरद्वारे टँकरमधून पाण्याची चोरी करण्यात येत होती.
दोन टँकरमधून पाणी चोरून घेऊन गेल्यानंतर तिसरा टँकर पाण्यासाठी आल्यानंतर तो टँकर पाणी भरून जात असताना ही घटना समोर आली. नीरा उजवा कालव्यामधून नीरा उजवा कालवा विभाग अंतर्गत येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर अवैधपणे पाणी चोरी होत असल्याचा आरोप शेतकरी करीत असताना आता रस्त्याच्या कामासाठी चक्क दिवसाढवळ्या पाण्याची चोरी होत आहे.
कालव्यामधून नीरा उजवा कालवा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पाण्याची चोरीवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.