कासच्या गळ्याला पाणी

By admin | Published: July 4, 2016 12:06 AM2016-07-04T00:06:00+5:302016-07-04T00:06:00+5:30

प्रतीक्षा चार फुटांची : सातारकरांची वर्षासाठी मिटणार चिंता

Water in the throats | कासच्या गळ्याला पाणी

कासच्या गळ्याला पाणी

Next

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव भरण्याच्या मार्गावर असून, कास भरण्यासाठी केवळ चार फूट पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. सोमवारपर्यंत कासच्या सांडव्यावरून पाणी वाहून लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
सातारा शहराच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी मुसळधार पावसाने तलावात तीन फूट पाणी वाढून अकरा फुटांवर आले. शनिवारी दिवस रात्रभर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे रविवारी दुपारपर्यंत पंधरा फूट पाणी झाले. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सोमवारी कास पूर्ण क्षमतेने भरणार आहे. दरम्यान, कण्हेर धरणाच्या पाणीपातळीतही वाढ होऊ लागली आहे.
यावर्षी पावसाला काहीसा उशीर झाल्याने सातारा शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले होते. जून संपला तरी शहराच्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात होता. गेल्या आठ दिवसांपासून शहराच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू झाली. अर्धा टीएमसी एवढी पाणी साठण्याची क्षमता असणारा कास तलाव पूर्णपणे भरला असल्याने सातारा शहराचा वर्षभर पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. शहराच्या पश्चिमेस यवतेश्वर, कास, बामणोली, परिसरात शनिवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. झरे फुटून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी वाहू लागले आहे. कास पठारावरून वाहणाऱ्या पाण्याने एकीव येथील धबधबे कोसळू लागले आहे. (वार्ताहर)
दहा दिवस उशीर...
गतवर्षी पावसाचे कमी प्रमाण, उन्हाची तीव्रता तसेच काही ठिकाणी जलवाहिनीची गळती, यामुळे कास तलावाची पाणी पातळी अगदी पाण्याच्या मृत साठ्यापर्यंत सहा फुटांवर आली होती. सातारकरांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. कास तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्यामुळे सातारकरांवरचे पाणीटंचाईचे संकट टळले आहे. गेल्या वर्षी २२ जूनला कास तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहा दिवसांनंतर कास तलाव भरत आहे.

Web Title: Water in the throats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.