ऐतिहासिक सदाशिवगडावर खळाळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:12 PM2018-11-11T23:12:45+5:302018-11-11T23:12:48+5:30

कºहाड : कºहाड तालुक्यातील ऐतिहासिक सदाशिवगडावर येत्या काही दिवसांत पाणी खळाळणार आहे. त्यासाठी मावळा प्रतिष्ठानने पुढाकार घेतला असून, लोकवर्गणीतून ...

The water will be flooded on the historic Sadashivad fort | ऐतिहासिक सदाशिवगडावर खळाळणार पाणी

ऐतिहासिक सदाशिवगडावर खळाळणार पाणी

Next

कºहाड : कºहाड तालुक्यातील ऐतिहासिक सदाशिवगडावर येत्या काही दिवसांत पाणी खळाळणार आहे. त्यासाठी मावळा प्रतिष्ठानने पुढाकार घेतला असून, लोकवर्गणीतून साकारल्या जाणाऱ्या पाणी योजनेच्या पाईपलाईनचा प्रारंभ गुरुवारी पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला.
यावेळी महालिंगेश्वर मठाचे मठाधिपती शिवाचार्य विजयलिंग महाराज, आमदार आनंदराव पाटील, जयंत पाटील, डॉ. सुभाषराव एरम, रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, रामकृष्ण वेताळ, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार आदी उपस्थित होते.
शिवाचा सदा वास असलेल्या ऐतिहासिक सदाशिवगडावर पाणी योजना राबविण्याचे शिवकार्य सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने हाती घेतले आहे. गडावर पाणी नेणे, ही सदाशिवाचीच इच्छा आहे, असे समजून सर्वांनी या योजनेला सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन यावेळी मठाधिपती शिवाचार्य विजयलिंग महाराज यांनी केले.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक सदाशिवगड ही या परिसराची अस्मिता आहे. गडावर विस्तीर्ण पठार असून, पठारावर सदाशिवाचे शिवकालीन मंदिर आहे. दरवर्षी श्रावणी सोमवार, महाशिवरात्री, प्रत्येक सोमवार व व्यायामासाठी हजारो भाविक, नागरिक गडावर येत असतात. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान, गडप्रेमी, शिवप्रेमी व ग्रामस्थांनी शासनाच्या निधीची वाट न पाहता गडावर भाविकांसाठी मूलभूत सुविधा उभारल्या आहेत.
गडावरील पाणी टंचाई दूर करण्यासाठी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने गडावर पाणी योजना राबविण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. त्यानुसार गडप्रेमी, शिवप्रेमी व ग्रामस्थांच्या माध्यमातून व लोकसहभागातून सुमारे १७ लाख रुपये खर्चाची पाणी योजना राबविण्यात येत आहे. जयवंत मुळीक यांच्या विहिरीतून गडावर पाणी नेण्यात येणार आहे.

Web Title: The water will be flooded on the historic Sadashivad fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.