नीरा-देवघर कालव्यातून मंगळवारी पाणी सोडणार

By admin | Published: April 22, 2017 12:59 PM2017-04-22T12:59:15+5:302017-04-22T12:59:15+5:30

शिवाजी बोळभट : वाघेशीपर्यंत सोडणार आवर्तन;अकरा गावांमधील शेतकऱ्यांची उपस्थिती

The water will leave on Tuesday through Neera-Deoghar canal | नीरा-देवघर कालव्यातून मंगळवारी पाणी सोडणार

नीरा-देवघर कालव्यातून मंगळवारी पाणी सोडणार

Next

आॅनलाईन लोकमत

शिरवळ (जि. सातारा), दि. २२ : खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार व उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या पाण्याच्या आवश्यकतेची गरज लक्षात घेऊन मंगळवार, दि. २५ एप्रिलपर्यंत कालव्याची कामे पूर्ण करून मोर्वे येथील पुलावरून पाईप टाकून त्याद्वारे वाघोशी गावापर्यंत नीरा-देवघर कालव्याचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात येईल, अशी माहिती नीरा-देवघर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट यांनी दिली.

नीरा-देवघर कालव्याची व वितरिकांची कामे पूर्ण करून प्रवाहित करून उपसा जलसिंचनाची कामे पूर्ण करून नीरा-देवघरचे पाणी वाघोशीपर्यंत प्रवाहित करण्यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांच्या वतीने खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: The water will leave on Tuesday through Neera-Deoghar canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.