वाई तालुक्यात हळदीचे उत्पन्न घटण्याच्या मार्गावर.. : शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 09:15 PM2019-02-02T21:15:42+5:302019-02-02T21:16:16+5:30

हळदीच्या पिकांवर लाखो रुपये खर्च झाला असून, दरासंदर्भात परवड झाली आहे. तसेच वाई तालुक्यातील शेतकºयांचा जीव मेटाकुटीला आला आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याचे संपूर्ण तालुक्यातील चित्र आहे.

On the way to lowering the yield of turmeric in Y. T. ..: The livelihood of the farmers is metakutila | वाई तालुक्यात हळदीचे उत्पन्न घटण्याच्या मार्गावर.. : शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला

वाई तालुक्यात हळदीचे उत्पन्न घटण्याच्या मार्गावर.. : शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला

Next
ठळक मुद्दे लाखो रुपये खर्चून पिकचा भाव मातीमोल, बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी एकत्रित येण्याची गरज

तानाजी कचरे ।
बावधन : हळदीच्या पिकांवर लाखो रुपये खर्च झाला असून, दरासंदर्भात परवड झाली आहे. तसेच वाई तालुक्यातील शेतकºयांचा जीव मेटाकुटीला आला आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याचे संपूर्ण तालुक्यातील चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील हळदीचे उत्पन्न घटण्याच्या मार्गावर आहे. अशी चर्चा हळदी शेतकºयांमधून होत आहे.

तालुक्यात हळदीच्या दरात उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने पिकासाठी लाखो रुपये खर्च करूनही बळीराजाच्या पदरी निराशाच पडत आहे. शासनासह बाजार समितीने शेतकºयांच्या हळदी पिकाला हमीभाव न दिल्यास सोन्याच्या किमतीचे पीक घेऊनही मातीमोल भावाने विकण्याची नामुष्की आली आहे. बाजार समितीतील उलाढाल ज्या पिकावर अवलंबून असते, त्याच बाजार समितीने कोणतेही शेतकºयांच्या हिताचे पाऊल उचलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हळदीच्या पिकाला हमीभाव मिळत नसल्याने हे पीक घेणाºया शेतक ºयांमध्ये संभ्रमावस्था आहे. भविष्यात हळद पिकाकडे शेतकºयांनी पाठ फिरविल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये. पिकाला भाव योग्य मिळत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे.

हळद उत्पादन शेतकºयाचे कर्ज कधीही कमी होताना दिसत नाही. त्यातच वाई तालुक्यातील हळद पिकाला व्यापारी शेतकºयाला बांधावर जाऊन पैसे देत असल्याने व्यापाºयांकडून हव्या त्या दराने हळद पिकाची किंमत लावली जाते. तसेच पीक लागवडीच्या अगोदरच शेतकºयांना उचल पैसे देत असल्याने दिलेल्या पैशाला व्यापाºयाकडून व्याजाचे पैसे आकारले जातात. त्यामुळेच हळद उत्पादक शेतकरी खºया अर्थाने अडचणीत येतो. त्यावेळी मिळालेल्या तुटपुंज्या दरामुळे शेतकºयाने ठरविलेल्या प्रापंचिक आर्थिक नियोजनाचे कंबरडे मोडलेले दिसते. अशी व्यथा वाई तालुक्यातील शेतकरी मांडत आहेत.

समितीच्या पदाधिकाºयांनी एकत्रित येऊन एक समिती गठीत करावी. या समितीच्या मार्फत हळद पिकाची व्यथा शासन दरबारी मांडून हळद दरासाठी भांडून हमीभाव घेण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. तरच पारंपरिक शेतकरी कुठेतरी तरला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हळदीचे पीक नामशेषाच्या मार्गावर
गेल्या पाच वर्षांपासून हळदीच्या मालाचा दर गडगडल्याने हळद उत्पादक शेतकºयांनी आपला माल दर वाढीच्या अपेक्षांनी खासगी शीतगृहात ठेवतात. त्यामुळे त्याचे भाडे आणि होणारे व्याज निघत नसल्याने हळदीचा माल शीतगृहाच्या मालकाच्या स्वाधीन करावा लागल्याचे बोलले जात आहे. हळदीच्या पिकास शासनाने हमीभाव न दिल्यास वाई तालुक्यातील हळदीचे पीक शेतातून नामशेस होण्याची भीती परिसरातील शेतकºयांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

 

कोणत्याही बाजार समितीत व्यापारी हा बाजारपेठ व शेतकरी यांच्यातील मुख्य दुवा असल्याने शेतकºयांकडून व्यापारी हव्या त्या भावात बोली बोलून प्रतवारी करून शेतकºयांची पिळवणूक करतो. बाजार समितीला व्यापाºयांकडून आर्थिक फायदा होत असल्याने व्यापाºयांची मनमानी चालते. बाजार समितीचे पदाधिकारी शेतकरीच, तरीही हळद पिकाच्या दराबाबत उदासीनता दिसून येते, हे दुर्दैव म्हणावे लागेल. एकंदरीत बाजार समितीवर व्यापाºयांचेच वर्चस्व पाहायला मिळते. हे चित्र बदलल्यास शेतकºयांची आर्थिक घडी सुधारू शकते.
- वसंत शिंदे, बावधन, प्रगत शेतकरी

Web Title: On the way to lowering the yield of turmeric in Y. T. ..: The livelihood of the farmers is metakutila

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.