आम्ही म्हणतोय जगवायचं, ह्यो म्हणतोय तोडायचं! पर्यावरण प्रेमींची निदर्शने

By प्रगती पाटील | Published: March 5, 2024 03:02 PM2024-03-05T15:02:20+5:302024-03-05T15:02:37+5:30

दुकानाचे नाव दिसत नाही म्हणून झाड मारणाऱ्यांविरूध्द मोहीम

We are saying to live, Hyo is saying to break! | आम्ही म्हणतोय जगवायचं, ह्यो म्हणतोय तोडायचं! पर्यावरण प्रेमींची निदर्शने

आम्ही म्हणतोय जगवायचं, ह्यो म्हणतोय तोडायचं! पर्यावरण प्रेमींची निदर्शने

 प्रगती जाधव पाटील 

सातारा : दुकानांचे नामफलक दिसत नाहीत म्हणून दीड दशके वाढलेली झाडे तोडण्याचा उद्योग राजपथावरील काही व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. यावर आळा बसविण्यासाठी साताऱ्यातील पर्यावरण प्रेमींनी मंगळवारी निदर्शेने करत पालिका प्रशासनाचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले. झाडे मारणाऱ्या या वृत्तीला कायदेशीर मार्गाने उत्तर द्यावे लागेल, असे आश्वासन पालिका प्रशासनाच्यावतीने आंदोलकांना देण्यात आले.

सातारा शहरातील राजपथावर विविध सामाजिक संघटना, संस्था, नवरात्रोत्सव आणि गणेश मंडळांच्या सहकार्याने झाडे लावुन त्यांना जगविण्यात आले. पंधरा फुटांपेक्षा उंच झालेल्या या झाडांनी राजपथाच्या साैंदर्यात भर टाकली. पण व्यापाराच्या निमित्ताने राजपथावर येणाऱ्या काही व्यावसायिकांना हे झाड म्हणजे शापीत साैंदर्य भासत आहे. त्यामुळे ते झाड जाळून मारण्याचे प्रकार सुरू करण्यात आले. या प्रवृत्तींना वेळोवेळी पर्यावरणप्रेमींनी हटकले आहे. पण नव्याने सुरू होणाऱ्या दुकानासमोर झाड तोडण्याच्या हालचाली दिसल्यानंतर पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले. लोकशाही मार्गाने आंदोलन करून त्यांनी हे झाड तोडले जाऊ नये यासाठी पालिका प्रशासनाची भेटही घेतली. यावेळी राजपथावरील कोणत्याही झाडाला धक्का लागु देणार नाही असे आश्वासन देण्यात आले.

या आंदोलनासाठी हरित सातारा ग्रुपचे कन्हैय्याला राजपुरोहित, अमोल कोडक, प्रकाश खटावकर, महेंद्र बाचल, उमेश खंडूझोडे, निखील घोरपडे, भालचंद्र गोताड, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोइटे, असिफ खान, ड्रोंगोचे सुधीर सुकाळे, विकास बहुलेकर, अनिकेत जगताप, इंद्रजीत इंदलकर, माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, जगन्नाथ कवळे, विनायक माटल, सुरेश झेपले आदी उपस्थित होते.

फलकांवरचा मजकुर भावला

झाड वाचविण्यासाठी राजपथावर एकत्र आलेल्या पर्यावरणप्रेमींनी सातारकरांचे लक्ष वेधून घेतले. ‘आम्ही म्हणतोय वाचवायचं... तर ह्याे म्हणतोय तोडायचं’, ‘व्यापार करा झाड तोडायचा उद्योग नको’, ‘प्रत्येक झाड मोलाचं’, ‘श्वास हवा तर ध्यास हवा’, ‘एकच ध्यास स्वच्छ श्वास’ असे फलक घेऊन उभे असणाऱ्या पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या हातातील बोर्डवरील मजुकर सातारकरांना भावला.

Web Title: We are saying to live, Hyo is saying to break!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.