आम्हा ना चिंता रेल्वेच्या प्लॅटफाॅर्म तिकिटाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:43 AM2021-09-22T04:43:50+5:302021-09-22T04:43:50+5:30

सातारा : कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होत असल्याने, रेल्वे मंत्रालयानेही कोरोना काळात वाढविलेले प्लॅटफाॅर्म ...

We don't worry about train platform tickets | आम्हा ना चिंता रेल्वेच्या प्लॅटफाॅर्म तिकिटाची

आम्हा ना चिंता रेल्वेच्या प्लॅटफाॅर्म तिकिटाची

Next

सातारा : कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होत असल्याने, रेल्वे मंत्रालयानेही कोरोना काळात वाढविलेले प्लॅटफाॅर्म तिकीट कमी केले आहे. ते आता दहा रुपयांवर आणले आहेत. मात्र, याचे कोणालाच सोयरसुतक नसल्यासारखेच आहे. कारण सातारा जिल्ह्यातील कोणत्याच स्थानकात प्लॅटफाॅर्म तिकीट काढले जात नाही.

सातारा जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा प्रवासासाठी एसटी किंवा खासगी वाहनांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे रेल्वेचा वापर खूपच कमी केला जातो, तसेच रेल्वे स्थानकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा दररोजचा संबंध येतो. दररोजची ऊठबस असते. त्यामुळे फारसे कोणी प्लॅटफाॅर्म तिकीट काढण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे रेल्वेला फार मोठा तोटा सहन करावा लागत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.

चौकट :

परजिल्ह्यातून येणारेच घेतात

१. सातारा जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाच्या परिसरात राहत असलेले कधीच तिकीट काढत नाहीत.

२. जर एखाद-दुसरी व्यक्ती परजिल्ह्यातून किंवा शहरातून आली, तरच ती खिडकीवर जाऊन तिकीट खरेदी करते.

३. अशा वेळी मात्र परगावी जाण्यासाठी रांगेत उभे असलेले आश्चर्याने पाहतच बसतात.

चौकट

सध्या रोज सुरू असलेल्या गाड्या

निझामुद्दीन-गोवा

महाराष्ट्र एक्स्प्रेस

महालक्ष्मी एक्स्प्रेस

कोयना एक्स्प्रेस

कोल्हापूर छत्रपती शिवाजी टर्मिनल स्पेशल ट्रेन

Web Title: We don't worry about train platform tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.