आम्ही ३०० दहशतवादी मारून बदला घेतला, सातारकरांच्या प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 01:35 PM2019-02-26T13:35:36+5:302019-02-26T13:36:44+5:30

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन शेकडो दहशतवादी मारल्यानंतर सातारकरांनी मोती चौकात फटाके वाजवत साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पाकिस्तानचा निषेध करत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागतही केले. तुम्ही ४० जवानांना मारले; पण आम्ही 3०० दहशतवादी मारून बदला घेतला, अशा प्रतिक्रिया सातारकरांनी व्यक्त केल्या.

We took revenge by killing 300 terrorists, Satarkar's reaction | आम्ही ३०० दहशतवादी मारून बदला घेतला, सातारकरांच्या प्रतिक्रिया

आम्ही ३०० दहशतवादी मारून बदला घेतला, सातारकरांच्या प्रतिक्रिया

Next
ठळक मुद्देआम्ही ३०० दहशतवादी मारून बदला घेतला, सातारकरांच्या प्रतिक्रियापाकिस्तानचा निषेध; फटाके फोडले, साखर अन् पेढे वाटून आनंदोत्सव

सातारा : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन शेकडो दहशतवादी मारल्यानंतर सातारकरांनी मोती चौकात फटाके वाजवत साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पाकिस्तानचा निषेध करत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागतही केले. तुम्ही ४० जवानांना मारले; पण आम्ही 3०० दहशतवादी मारून बदला घेतला, अशा प्रतिक्रिया सातारकरांनी व्यक्त केल्या.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर आत्मघातकी हल्ला केला होता. यामध्ये ४० जवानांना वीरमरण आले होते. त्यामुळे भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकमधील हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. हवाई दलाच्या या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सुमारे ३०० दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज आहे. भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकचे वृत्त साताऱ्यात धडकताच नागरिकांनी मोती चौकात एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.

मोती चौकात शेकडोच्या संख्येने एकत्र येत सातारकरांनी फटाके वाजविले. तसेच साखर अन् पेढे वाटण्यात आले. रस्त्यावरून जाणारे वाहनचालक, दुकानदार, सातारकर नागरिकांना पेढे वाटून हा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार, नगरसेवक विजय काटवटे, किशोर पंडित, नगरसेविका आशा पंडित, किशोर गोडबोले, सुनील काळेकर आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार म्हणाले, ह्य१४ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला करून ४० जणांना ठार केले होते. त्यामुळे भारतीयांच्या मनात दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता. मंगळवारी पहाटे भारताच्या हवाई दलाने पाकमध्ये जाऊन दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. यामध्ये ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. तुम्ही आमचे ४० मारले; पण आम्ही ४०० मारू, हेच भारताने आता दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत.

Web Title: We took revenge by killing 300 terrorists, Satarkar's reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.