जिल्ह्यातील रुग्णवाढ पाच टक्क्यांच्या खाली आणायचीय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:19+5:302021-07-16T04:27:19+5:30

सातारा : ‘जिल्ह्यामध्ये राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. पाच दिवसांचा अंदाज घेऊन शुक्रवारी नवीन ...

We want to bring the number of patients in the district below five percent! | जिल्ह्यातील रुग्णवाढ पाच टक्क्यांच्या खाली आणायचीय!

जिल्ह्यातील रुग्णवाढ पाच टक्क्यांच्या खाली आणायचीय!

Next

सातारा : ‘जिल्ह्यामध्ये राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. पाच दिवसांचा अंदाज घेऊन शुक्रवारी नवीन निर्णय घेतला जातो. आपत्ती निवारण समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात येणार आहे, या बैठकीत जिल्ह्यातील नवीन निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाणार आहे, जिल्ह्यातील रुग्णवाढ पाच टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी जिल्हावासीयांची साथ आवश्यक आहे,’ असे भावनिक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेली आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यामध्ये कोविडची परिस्थिती दोन आठवड्यांपूर्वी कोरोना रुग्णवाढीचा दर १५ टक्के झाला होता. १८ जूनपासून २५ जूनपर्यंत जिल्ह्यात तिसरा स्तर होता. हा स्तर १५ दिवस सुरू ठेवण्यात आला होता. मात्र, याचा गैरफायदा लोकांनी घेतला. बाजारात मोठी गर्दी केली. त्यामुळे २ ते ७ जुलै अखेर कोरोना रुग्णवाढ मोठ्या प्रमाणावर झाली. रुग्णवाढीचा दर १४ टक्क्यांच्यावर गेला. त्यामुळे मागील पंधरवड्यात चौथ्या टप्प्यातील निर्बंध संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत.

मात्र, सोमवार, दि. १२ पासून जिल्ह्यात रुग्णवाढ कमी झालेली दिसते. आरटीपीसीआरची रुग्णवाढ कमी आहे. मात्र, आजूबाजूच्या जिल्ह्यांची परिस्थिती आपण लक्षात घेतली तर या जिल्ह्यांमध्ये चौथ्या टप्प्यातील निर्बंध उठवल्यानंतर लोकांकडून काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे सांगली जिल्हा तिसऱ्या टप्प्यातून चौथ्या टप्प्यामधील निर्बंध लागू करण्यात आले. लोक काळजी घेत नसल्याने कडक निर्बंध लागू करावे लागले आहेत.

लॉकडाऊनमुळे पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसायावर अवलंबून लोक असतील, त्यांच्यासाठी लॉकडाऊन म्हणजे अन्यायकारक वाटते. मात्र दुकाने उघडल्यानंतर ग्राहक, दुकानदार, हॉटेल मालक जबाबदारी पाळत नाहीत. निर्बंध कमी केले की रुग्णसंख्यादेखील वाढते. ४ जूनच्या आदेशाप्रमाणे निर्बंध आहेत. लोकांवर मोठी जबाबदारी आहे. ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ ही योजना राज्य शासनाने राबवली आहे. प्रत्येकाने स्वत: जबाबदारी उचलली तर काही प्रमाणात नियम शिथिल करता येतील. शुक्रवारी बैठक घेतल्यानंतर निर्बंध उठविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. निर्बंध कमी केले तरी लोकांची जबाबदारी वाढते आहे. सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णवाढ पाच टक्क्यांच्या खाली कसे आणता येईल, हे करावे लागेल.

तो व्हिडिओ गेल्या वर्षीचा..

१४ जुलै २०२० ची जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाची चित्रफीत समाज माध्यमांमध्ये सध्या फिरत आहे. या चित्रफितीनुसार काही लोक चुकीच्या पद्धतीने संदेश पसरवत आहेत. मात्र, तत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ते आव्हान केले होते, आता परिस्थिती वेगळी आहे. राज्य शासनाने ४ जून रोजी काढलेल्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार वाढीची किंवा कमी होण्याची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हास्तरीय बैठक घेऊन निर्बंध लागू करण्याबाबतचे निर्णय घेण्यात यावेत, असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल, त्यामध्ये पुढील निर्णय होणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रशासनातर्फे १२ ते १३ हजार तपासण्या करण्यात येत आहेत.

-----------------

जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांचा आयकार्ड फोटो वापरावा

Web Title: We want to bring the number of patients in the district below five percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.