पाटण सेंटरसाठी लवकरच जनरेटर देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:40 AM2021-05-09T04:40:09+5:302021-05-09T04:40:09+5:30

रामापूर : ‘पाटण तालुक्यामध्ये कोरोना नियंत्रणासाठी माझ्याकडून व जिल्हा परिषद यांच्याकडून लागेल ती मदत करण्याचा तसेच इथे असणारी विजेची ...

We will provide generator for Patan center soon | पाटण सेंटरसाठी लवकरच जनरेटर देऊ

पाटण सेंटरसाठी लवकरच जनरेटर देऊ

Next

रामापूर : ‘पाटण तालुक्यामध्ये कोरोना नियंत्रणासाठी माझ्याकडून व जिल्हा परिषद यांच्याकडून लागेल ती मदत करण्याचा तसेच इथे असणारी विजेची अनियमितता लक्षात घेता पाटण कोविड सेंटरसाठी लवकरच जनरेटर उपलब्ध करून देण्यात येईल,’ असा शब्द आ. शशिकांत शिंदे यांनी दिला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सत्यजितसिंह पाटणकर यांच्या उपस्थितीत पाटण पंचायत समिती येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी पाटण तालुक्यातील रुग्णसंख्या, उपलब्ध बेड, होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण त्यांची व्यवस्था याबाबत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

तालुक्यात पाटण कोविड केअर सेंटर व इतर सर्व ठिकाणी सुरू असलेल्या कोरोना सेंटरमध्ये आवश्यकतेनुसार बेड वाढवण्याच्या तसेच तेथे ऑक्सिजन व इतर वैद्यकीय सुविधांबरोबरच रुग्णांसाठी शुद्ध पाणी व स्वच्छता ठेवावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

तालुक्यात दुर्गम असणाऱ्या कोयना, काळगाव, ढेबेवाडी, महिंद, तारळे यासह सर्व विभागात कोणताही रुग्ण उपचाराविना वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी. येथील कोविड केअर सेंटरसाठी जनरेटर देऊन तेथील रुग्णांची वीज गेल्याने होणारी गैरसोय टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वांना सोबत घेऊन घरातील व्यक्तीप्रमाणे रुग्णांची काळजी घ्या, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी पाटणचे तहसीलदार

योगेश्वर टोम्पे, पाटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सभापती राजाभाऊ शेलार, तालुक्यातील आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

०८पाटण

फोटो- पाटण पंचायत समिती येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी शशिकांत शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सत्यजितसिंह पाटणकर,

योगेश्वर टोम्पे, मीना साळुंखे उपस्थित होते.

Web Title: We will provide generator for Patan center soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.