केंद्र शासनाच्या विविध विभागांशी समन्वय करून सोडविण्याचा प्रयत्न करू :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:35 AM2021-03-07T04:35:37+5:302021-03-07T04:35:37+5:30

सातारा : केंद्र शासनाच्या विविध विकास योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी. खास करून ग्रामविकासाच्या योजनांवर भर ...

We will try to solve it by coordinating with various departments of the Central Government: | केंद्र शासनाच्या विविध विभागांशी समन्वय करून सोडविण्याचा प्रयत्न करू :

केंद्र शासनाच्या विविध विभागांशी समन्वय करून सोडविण्याचा प्रयत्न करू :

Next

सातारा : केंद्र शासनाच्या विविध विकास योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी. खास करून ग्रामविकासाच्या योजनांवर भर द्यावा; जेथे विकासाच्या योजना राबविण्यात अडचणी येतील, त्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाच्या विभागांशी समन्वय करून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) अध्यक्ष तथा खासदार श्रीनिवास पाटील व सहअध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.

केंद्र शासनाच्या योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ज्ञानाचा व अनुभवाचा वापर करून समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभेचे अध्यक्ष तथा खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष तथा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला समितीचे सहअध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांच्यासह समितीचे सदस्य व विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत विकासकामांना येणाऱ्या अडचणी समजून घ्या. त्या अडचणी पुढील बैठकीत सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यावर सातारा जिल्हा नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. प्रत्येकाने आपल्या ज्ञानाचा वापर करून केंद्र शासनाच्या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी व योजना राबविण्यात आपला देशात प्रथम क्रमांक राहावा यासाठी प्रयत्न करावेत, असेही अध्यक्ष तथा खासदार श्रीनिवास पाटील यांनी या बैठकीत सांगितले.

केंद्र शासनाच्या योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा. विकासाबाबत काही नवीन कल्पना असतील त्या सांगा. त्या कल्पना केंद्र शासनाकडे मांडल्या जातील, असे सहअध्यक्ष तथा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी या बैठकीत सांगितले.

या बैठकीच्या प्रारंभी प्रत्येक विभागनिहाय कामांचा आढावा घेण्यात आला.

Web Title: We will try to solve it by coordinating with various departments of the Central Government:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.