मतदारांच्या हाती ‘सी व्हिजील’ अ‍ॅप नावाचे शस्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:54 PM2019-09-26T23:54:25+5:302019-09-26T23:57:02+5:30

सी व्हिजील’ अ‍ॅप या प्रकारांवर निर्बंध घालू शकते, अथवा असे प्रकार उघडकीस आणू शकते. जवळपास प्रत्येकाच्या हातात आता अँड्रॉईड मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये निवडणूक आयोगाचे ‘सी व्हिजील’ अ‍ॅप हे अपलोड केल्यास नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

A weapon called 'C Vigil' app in the hands of voters | मतदारांच्या हाती ‘सी व्हिजील’ अ‍ॅप नावाचे शस्त्र

मतदारांच्या हाती ‘सी व्हिजील’ अ‍ॅप नावाचे शस्त्र

Next
ठळक मुद्दे: मोबाईलवर फोटो अथवा व्हिडीओ तयार करून निवडणूक विभागाला पाठविण्याचे आवाहन गैरप्रकारांवर नजर

सागर गुजर ।
सातारा : निवडणूक आयोगाने निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी सुरू केलेले ‘सी व्हिजील’ अ‍ॅप हे प्रत्येक मतदार नागरिकांच्या हाती शस्त्राच्या रुपात उपलब्ध झाले आहे. निवडणुकीत कुठेही कसलाही गैरप्रकार आढळल्यास किंवा आचारसंहिता भंगाचा प्रकार होत असल्यास नागरिकाने मोबाईलवर त्याचे फोटो अथवा व्हिडीओ करून तो या अ‍ॅपवर अपलोड करायचा आहे.

जिल्ह्यातील ८ विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. आचारसंहिता जाहीर झालेली आहे. त्यामुळे अनेक गैरप्रकारांवर निर्बंध आणण्यासाठी निवडणूक विभाग कामाला लागला आहे. मात्र, अनेकदा पैसे वाटप, मद्य वाटप अथवा जेवणावळ्या घातल्या जातात. मतदारांना आमिष दाखविण्याचेही प्रकार होताना दिसतात. ‘सी व्हिजील’ अ‍ॅप या प्रकारांवर निर्बंध घालू शकते, अथवा असे प्रकार उघडकीस आणू शकते. जवळपास प्रत्येकाच्या हातात आता अँड्रॉईड मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये निवडणूक आयोगाचे ‘सी व्हिजील’ अ‍ॅप हे अपलोड केल्यास नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

या अ‍ॅपवर जिआॅग्राफिक इन्फॉरमेशन सिस्टीम असल्याने ज्या ठिकाणी घटना घडली. त्याचा फोटो पाच मिनिटांच्या आत या अ‍ॅपवर अपलोड करावा लागतो. तसेच दोन मिनिटांच्या कालावधीचा व्हिडीओदेखील करून पाठवता येऊ शकतो. ‘सी व्हिजील’ अ‍ॅपमुळे निवडणूक विभागाला मोठा हातभार मिळाला आहे.


लोकसभा निवडणुकीत ६६ तक्रारी
चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ‘सी व्हिजील’ अ‍ॅपवर ६६ तक्रारी दाखल झाल्या होत्या.
त्यापैकी दखलपात्र ठरलेल्या २२ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली.
५ व्हिडिओ आणि ६० फोटोही या अ‍ॅपवर अपलोड झाले होते.

अ‍ॅप्लिकेशन कसे वापरावे ?
पायरी १
नागरिक छायाचित्र क्लिक करतो किंवा दोन मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड करतो. भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे स्वयंचलित स्थान मॅपिंगसह अ‍ॅपवर फोटो / व्हिडीओ अपलोड केला जातो. यशस्वीपणे सबमिशन केल्यावर, नागरिकास त्याच्या मोबाईलवर पाठपुरावा अद्ययावत ट्रॅक करण्यास आणि प्राप्त करण्यासाठी युनिक आयडी मिळतो.
पायरी २
एकदा नागरिकाने तक्रार नोंदवल्यानंतर, जिल्हा कंट्रोल रूममध्ये जिथे फिल्ड युनिटला नेमले जाते, तिथे माहिती बीप होते. फील्ड युनिटमध्ये फ्लार्इंग स्क्वॉड्स, स्टॅटिक पाळत ठेवणारी टीम, रिझर्व्ह टीम प्रत्येक फिल्ड युनिटमध्ये ‘सीव्हीआयजीआयएल इन्व्हेस्टिगेशन’ नावाचा एक जीआयएस-आधारित मोबाईल, अ‍ॅप्लिकेशन असेल जो फिल्ड युनिटला जीआयएस संकेत आणि नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचे अनुसरण करून थेट त्या ठिकाणी पोहोचू देतो आणि कारवाई करतो.
पायरी ३
फिल्ड युनिट तक्रारीवरून कार्यवाही केल्यानंतर त्यांच्यामार्फत निर्णय आणि विल्हेवाट लावण्यासाठी फिल्ड रिपोर्ट संबंधित रिटर्निंग आॅफिसरला अन्वेषक अ‍ॅपद्वारे आॅनलाईन पाठविला जातो. ही घटना योग्य आढळल्यास पुढील कार्यवाहीसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविली जाते आणि जागरुक नागरिकाला १०० मिनिटांत स्थितीबद्दल माहिती दिली जाते.

Web Title: A weapon called 'C Vigil' app in the hands of voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.