जिल्ह्यात ९ सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश
By admin | Published: September 5, 2014 09:35 PM2014-09-05T21:35:36+5:302014-09-05T23:23:38+5:30
सातारा जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस मनाई
सातारा : टोलनाका, राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण, ऊस आंदोलन, दुष्काळी भागातील वीज भारनियमन, धरणग्रस्त आंदोलने, मोर्चे व धरणे आंदोलने होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी संजीव देशमुख यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (३) नुसार संपूर्ण सातारा जिल्ह्यात दि. २८ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर २०१४ या कालावधीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे.या आदेशानुसार नागरिकांना शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुऱ्या, काठ्या-लाठ्या किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे, दगड किवां अस्त्र, सोडवयाची अस्त्रे, फेकावयाची हत्यादे किंवा साधणे बरोबर घेणे, जमा किंवा तयार करणे, कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, व्यक्तीची अगर प्रेते किंवा त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिकरितीने घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे, सभ्यता अगर नितीविरुध्द असतील अशी किंवा राज्याची शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे अशी चित्रे-चिन्हे, फलक अगर इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा त्यांचा लोकांत प्रसार करणे अशा बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत सातारा जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस मनाई करण्यात आली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)