डबल मास्क घाला.. कोरोना टाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:42 AM2021-05-06T04:42:31+5:302021-05-06T04:42:31+5:30
सातारा : कोरोनाबरोबरच इतर आजारांच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी वापरला जाणारा मास्क नागरिकांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. मास्कबाबत शासनही ...
सातारा : कोरोनाबरोबरच इतर आजारांच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी वापरला जाणारा मास्क नागरिकांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. मास्कबाबत शासनही व्यापक स्वरूपात जागृती करू लागले आहे. विशेष म्हणजे आता ‘डबल मास्क घाला व कोरोनाला टाळा’ अशी जनजागृती केली जात असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनीदेखील या बाबीला दुजोरा दिला आहे.
‘मास्क इज मेडिसिन’ अशी संकल्पना सर्वत्र रुजू झाली आहे. मास्कशिवाय आपल्याकडे आता पर्याय नाही, असा विचार करत नागरिक औषध म्हणून मास्कचा वापर करू लागले आहेत. कोरोना विषाणूने आज संपूर्ण जगात थैमान घातले आहे. हा विषाणू नाक, डोळे व तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करीत असल्याने तज्ज्ञांनी नियमित मास्क वापरण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.
सर्जिकल किंवा एन ९५ मास्क महागडे असले तरी अनेक जण कापडी व चार लेअरचे मास्क तयार करून वापरू लागले आहेत. कोरोनापासून बचाव करण्याकरिता मास्कची उपयोगिता सिद्ध होऊ लागली आहे. पोलिसांच्या भीतीमुळे का असेना आज प्रत्येक जण मास्क वापरू लागला आहे. मास्कची उपयोगिता सिद्ध झाल्याने आता घराबाहेर पडणारे नागरिक डबल मास्कचा वापर करू लागले आहेत.
(चौकट)
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी मास्क हाच पर्याय
घराबाहेर पडताना अनेक जण तोंडावर मास्क आहे किंवा नाही, याची शहानिशा करूनच घराबाहेर पडत आहेत. काही जण मास्कचा वापर न करताच निर्धास्तपणे वावरत होते. मात्र, कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अशा लोकांना मास्कचे महत्त्व कळू लागले आहे. त्यामुळे स्वत:सह इतरांच्या सुरक्षेसाठी जो-तो मास्कचा वापर करू लागला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात अजूनही संशोधन सुरू आहे. कालांतराने या आजारावरील औषधाचा शोधही लागेल. मात्र, सध्यातरी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क हाच आपल्यापुढे पर्याय आहे.
(चौकट)
असा वापरावा मास्क
- अनेक जण मास्क हनुवटीवर घालतात. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे.
- तोंड आणि नाक झाकले गेले पाहिजे, असा मास्कचा आकार हवा.
- जेणेकरून कोरोनाचे विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करता कामा नयेत.
- सर्जिकल, एन ९५ मास्क उत्तम. मात्र चार लेअरचा कापडी मास्कही वापरता येऊ शकतो.
- वारंवार मास्कला हात न लावता काढतानाही आपले हात स्वच्छ धुवावेत व त्यानंतर मास्क काढून स्वत:ला सॅनिटाईज करावे.
(कोट)
हे करा..
मास्क हनुवटीवर लावण्याचे प्रमाण अधिक दिसते. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. हनुवटीवर लावलेला मास्क जेव्हा आपण तोंडाला लावतो तेव्हा हनुवटीवरील विषाणू नाकात जाण्याची शक्यता बळावते. त्यामुळे संपूर्ण तोंड व नाक झाकले जाईल, अशा पद्धतीने मास्क घालावा.
- डॉ. ज्ञानेश्वर हिरास, सातारा
(कोट)
हे करू नका..
तोंडाला मास्क लावल्यानंतर हात वारंवार मास्कला लावू नका. मास्क काढल्यानंतर सॅनिटायझरने हात धुवावेत. तसेच हात व नाकाला स्पर्श करू नये. कमी दर्जाचे मास्क वापरू नयेत. सर्जिकल मास्क शक्य नसल्यास किमान चार लेअरच्या कापडी मास्कचा वापर करावा.
- डॉ. महेश हावळ, सातारा
(पॉइंटर)
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण - १,१४,२४२
बरे झालेले रुग्ण - ९०,४८४
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - २०,९६४
होम आयसोलेशनमधील रुग्ण - १७,५००
*डमी फाईल