बाजरी पिकावर अज्ञाताकडून तणनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:43 AM2021-08-24T04:43:00+5:302021-08-24T04:43:00+5:30

आदर्की : बिबी (ता. फलटण) येथील शेतकरी लक्ष्मण नलवडे यांच्या अर्धा एकर बाजरी पिकावर अज्ञाताने तणनाशक फवारून पिकाचे नुकसान ...

Weedicide spraying on millet crop from unknown | बाजरी पिकावर अज्ञाताकडून तणनाशक फवारणी

बाजरी पिकावर अज्ञाताकडून तणनाशक फवारणी

Next

आदर्की : बिबी (ता. फलटण) येथील शेतकरी लक्ष्मण नलवडे यांच्या अर्धा एकर बाजरी पिकावर अज्ञाताने तणनाशक फवारून पिकाचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

फलटण तालुक्यात पाण्याचा दुष्काळ असताना पाण्यावाचून पिके वाळून जात होती. आता फलटण तालुक्यात घोम-बलकवडी उजव्या कालव्यातून बिबी परिसरात पाणी आल्याने बागायती क्षेत्र वाढल्याने उत्पादनात वाढ झाली. त्यामुळे काही प्रमाणात शेतकरी सधन होत असल्याचे चित्र दिसत असतानाच अप्प्रवृत्ती वाढल्याने बिबी (ता. फलटण) येथील शेतकरी लक्ष्मण नलवडे यांनी आपल्या मालकीच्या गट नं. १२० मध्ये संकरित बाजरी पिकाची पेरणी केली होती. बाजरी निसवून स्थिर होऊन कणसात धान्य भरण्याच्या अवस्थेत असताना अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारल्यामुळे बाजरी पीक जागेवरच करपून गेल्याने त्यांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रार दाखल केली आहे, तर गाव कामगार तलाठी, कृषी सहायक यानी नुकसानीचा पंचनामा केला आहे.

२३आदर्की..

फोटो - बिबी (ता. फलटण) येथे बाजरी पिकावर तणनाशक मारून नुकसान केले आहे. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)

Web Title: Weedicide spraying on millet crop from unknown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.