वीकेंड लाॅकडाऊनचा एस.टी.ला एक कोटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:35 AM2021-04-14T04:35:28+5:302021-04-14T04:35:28+5:30

सातारा : दोन दिवसांच्या मिनी लाॅकडाऊनमुळे एस.टी.च्या वाहतुकीच्या उत्पन्नाला मोटा फटका बसला आहे. जिल्ह्यातील ११ आगारांमधील दोन दिवस एस.टी.च्या ...

Weekend lockdown hits ST with Rs 1 crore | वीकेंड लाॅकडाऊनचा एस.टी.ला एक कोटीचा फटका

वीकेंड लाॅकडाऊनचा एस.टी.ला एक कोटीचा फटका

Next

सातारा : दोन दिवसांच्या मिनी लाॅकडाऊनमुळे एस.टी.च्या वाहतुकीच्या उत्पन्नाला मोटा फटका बसला आहे. जिल्ह्यातील ११ आगारांमधील दोन दिवस एस.टी.च्या फेऱ्या बंद ठेवल्याने सुमारे एक कोटीचे नुकसान झाल्याची माहिती एस,टी. प्रशासनाने दिली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात शनिवार आणि रविवार वीकेंड लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या बंदचा फटका एस.टी. वाहतुकीला बसला आहे. राेज सुमारे ३५० बसच्या फेऱ्यांतून जिल्ह्यातील ११ आगारांतील रोजच्या सुमारे एक हजार २०० हून अधिक फेऱ्या होतात. या सर्व फेऱ्या दोन दिवस रद्द करण्यात आल्याने रोजचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. आधीच मार्च ते सप्टेंबर या महिन्यांतील लाॅकडाऊनमुळे एस.टी. तोट्यात आली असताना पुन्हा एकदा वीकेंड लाॅकडाऊनचा फटका एस.टी.ला बसल्याचे दिसून येत आहे.

दोन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊनमुळे एस.टी. वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मात्र, सोमवार (दि. १२) पासून लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर सातारा-पुणे विनाथांबा सातारा-दादर, सातारा-बोरिवली या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांची संख्या पाहून ग्रामीण भागातील वाहतुकीच्या बस सोडण्यात येत असल्याचे एस.टी. प्रशासनाने सांगितले.

Web Title: Weekend lockdown hits ST with Rs 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.