नागठाणे येथील आठवडी बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 06:01 PM2022-01-10T18:01:16+5:302022-01-10T18:01:58+5:30

नागठाणे (ता. सातारा) हे तालुक्यातील बाजारपेठेचं मोठं गाव आहे. या गावाला दिवसाकाठी जवळपास पन्नास गावांच्या संपर्क येतो.

Weekly market at Nagthane closed satara district | नागठाणे येथील आठवडी बाजार बंद

नागठाणे येथील आठवडी बाजार बंद

googlenewsNext

नागठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सातारा तहसीलदारांच्या आदेशानुसार मंगळवारी होणारा नागठाणे येथील आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती गावच्या सरपंच डॉ. रुपाली बेंद्रे यांनी दिली आहे.

नागठाणे (ता. सातारा) हे तालुक्यातील बाजारपेठेचं मोठं गाव आहे. दिवसाकाठी जवळपास पन्नास गावांच्या संपर्कात येणार नागठाणे हे मोठं गाव असून, दररोज शेकडो चाकरमानी कामकाजासाठी तसेच शेकडो विद्यार्थी या गावातून मजल दरमजल सातारा येथे शिक्षणासाठी ये-जा करत असतात. 

आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी येथे बाजार भरत असून काशीळ, निसराळे, खोडद, अतीत, माजगाव, पाल खंडोबाची, हरपळवाडी, सासपडे, गणेशवाडी, निनाम, पाडळी, मांडवे, बोरगाव, भरतगाव, भरतगाववाडी तसेच वळसे आदी गावांतून बरेच ग्रामस्थ, महिला या आठवडी बाजारासाठी येत असतात. परंतु जिल्ह्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे तहसीलदारांच्या आदेशानुसार होणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती गावच्या सरपंच बेंद्रे यांनी दिली आहे.

Web Title: Weekly market at Nagthane closed satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.