साताऱ्यासह तालुक्यातील आठवडी बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 06:03 PM2021-04-08T18:03:00+5:302021-04-08T18:04:51+5:30

CoronaVirus Satara Market- सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण मोठया प्रमाणात आढळून येत असल्याने सातारा शहर व सातारा तालुक्यातील सर्व आठवडी बाजार पुढील आदेश हाईपर्यंत बंद करण्यात आलेला आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे.

Weekly markets in the taluka including Satara are closed | साताऱ्यासह तालुक्यातील आठवडी बाजार बंद

साताऱ्यासह तालुक्यातील आठवडी बाजार बंद

Next
ठळक मुद्देसाताऱ्यासह तालुक्यातील आठवडी बाजार बंदकोरेगाव तालुक्यातील आठवडी बाजार बंद

सातारा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण मोठया प्रमाणात आढळून येत असल्याने सातारा शहर व सातारा तालुक्यातील सर्व आठवडी बाजार पुढील आदेश हाईपर्यंत बंद करण्यात आलेला आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निर्दशनास आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदी नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुल्ला यांनी दिला आहे.

कोरेगाव तालुक्यातील आठवडी बाजार बंद

सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळत असल्याने कोरेगाव तालुक्यातील आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव, रहिमतपूर, वाठार स्टेशन, वाठार किरोली, किन्हई व पिंपोडे बुद्रुक या ठिकाणी आठवडी बाजार भरतात, हे बंद राहणार आहेत. तर कोरेगाव येथील जनावरांचा बाजारही ८ ते ३० एप्रिल या कालावधीत बंद करण्यात आलेला आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केले आहे.

Web Title: Weekly markets in the taluka including Satara are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.