हजारमाचीच्या सीमेवर लागला स्वागताचा फलक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:21+5:302021-07-15T04:27:21+5:30
ओगलेवाडी : हजारमाची (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीच्या वतीने प्रथमच गावच्या सीमेवर चार ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. यामुळे गुहाघर-विजयपूर राष्ट्रीय ...
ओगलेवाडी : हजारमाची (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीच्या वतीने प्रथमच गावच्या सीमेवर चार ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. यामुळे गुहाघर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या बाहेरगावच्या प्रवाशांत हजारमाची गावाची ओळख निर्माण होणार आहे.
या फलकाचे अनावरण ज्येष्ठ नागरिक प्रल्हादराव डुबल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच विद्या घबाडे, उपसरपंच प्रशांत यादव, सदस्य कल्याणराव डुबल, अवधूत डुबल, पितांबर गुरव, निर्मला जिरगे, वनवासमाचीचे सरपंच महादेव माने, बाबरमाचीचे सदस्य अधिक पाटील, शिवाजीराव डुबल, दीपक लिमकर, प्रकाश पवार, पराग रामुगडे, सूर्यभान माने, सतीश जांभळे, राजू सूर्यवंशी, आदींची उपस्थिती होती.
प्रशांत यादव म्हणाले, ‘गुहाघर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गाचा जवळपास तीन किलोमीटरचा रस्ता हजारमाची ग्रामपंचायत हद्दीतून गेला आहे. महामार्गाच्या दुतर्फा ओगलेवाडीची बाजारपेठ आहे. हजारमाची ग्रामपंचायत हद्दीत जागतिक पातळीवरील भूकंप संशाेधन केंद्र आहे. या रस्त्यावरून अगदी सोलापूर, पंढरपूर, विजयपूर व हैदराबादपर्यंतचे लोक प्रवास करीत असतात. मात्र, हजारमाचीची ओळख सांगणारा कसलाही फलक रस्त्यात नव्हता. याबाबत ग्रामपंचायतीच्या बैठकीत गावच्या हद्दीवर चार ठिकाणी फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला.’
१४ओगलेवाडी
ओगलेवाडी येथे स्वागतफलकाच्या अनावरणप्रसंगी प्रल्हादराव डुबल, विद्या घबाडे, प्रशांत यादव, कल्याणराव डुबल, अवधूत डुबल, आदी उपस्थित होते.