गावाकडच्या चटणीचा काय वर्णावा थाट! महानगरांमधून वाढतेय मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:43 PM2018-04-19T23:43:07+5:302018-04-19T23:43:07+5:30

सातारा : महानगरांमध्ये वाढत जाणारे सिमेंटचे जंगल आणि लुप्त झालेले अंगण यामुळे उन्हाळी कामांसाठी तेथील महिलांना साताऱ्याचा आसरा घ्यावा लागत आहे.

 What is the chaat chaat of village! Increasing demand among metros | गावाकडच्या चटणीचा काय वर्णावा थाट! महानगरांमधून वाढतेय मागणी

गावाकडच्या चटणीचा काय वर्णावा थाट! महानगरांमधून वाढतेय मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे मिरची पावडर तयार करून शहरांकडे नेण्याकडे दिसतोय कल

सातारा : महानगरांमध्ये वाढत जाणारे सिमेंटचे जंगल आणि लुप्त झालेले अंगण यामुळे उन्हाळी कामांसाठी तेथील महिलांना साताऱ्याचा आसरा घ्यावा लागत आहे. शहरात उपलब्ध होणाºया वस्तू आणि अपार्टमेंटमध्येही जिवंत असलेली माणुसकी यामुळे साताºयाच्या अंगणात सध्या मुंबईकरांच्या मसाल्याचं वाळवणं पडलेलं दिसत आहे.
नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्तानं आपलं गाव सोडून मोठ्या शहरात वसलेल्या कुटुंबाला वर्षभराची चटणी, पापड, कुरडई, सांडगे आदी करण्यासाठी साताºयाकडे किंवा त्यांच्या गावाकडे जावे लागते.
एप्रिल महिन्यात मुलांची परीक्षा संपल्यानंतर सर्वत्रच मिरची आणणे निवडणे, भाजणे, मसाला तळणे आणि मिरची कांडून आणण्याची धांदल सुरू असते.
मोठ्या शहरांत घरे जवळ जवळ असल्यामुळे पदार्थ करणं आणि वाळत घालणं यासाठी जागा नसल्यामुळे अडचण होत आहे.

'दरांमध्ये तिपटीने फरक
साताºयात गुंटूर १२०-१२५, ब्याडगी १८०-२०० व लवंगी मिरची १३० ते १३५ रुपये किलो या दराने विक्री होत आहे. एक किलो मिरचीसाठी साधारण १५० ते २५० रुपयांचा मसाला लागतो. मिरची कांडण्यासाठी १५ पंधरा रुपये घेतात. महानगरांमध्ये मिरची आणि मसाला या दोन्हीबरोबरच कांडण्याचे दरही तिप्पट आहेत. चार जणांच्या कुटुंबाला तीन किलो चटणी वर्षाला पुरून उरते. जागेच्या अडचणीबरोबरच दरांच्या आकड्यांची बेरीज केली तर साताºयात किंवा गावात येऊन मिरची पावडर तयार करून नेणं परवडत असल्याचे मुंबईस्थित गृहिणी मंदाकिनी काळभोर यांनी सांगितले.
वेफर्स अन् कुरवड्याही
महानगरांमध्ये राहणाºया महिला साताºयातून मिरची पावडरबरोरबच वेफर्स, पापड, सांडगे, कुरडई, सालपापड्या, उपवासाचे पापड आदी वर्षभराचे तळण प्रकार येथूनच करून मुंबईला घेऊन जातात.

वर्षाचे धान्य देण्याकडेही कल
मुंबई-पुण्यात टेरेसही रिकामे नसल्याचे चित्र दिसते. त्यामुळे शेतातील धान्य उन्हाळी आणि दिवाळी सुटीत घेऊन जाण्याकडे कल आहे. येथे कडक उन्हात वाळवलेले धान्य वर्षभर तेथे खराब होत नाही.

पुण्या-मुंबईकडून गावाकडे आलेल्यांची चटणी करण्याची धांदल जाणवते. दिवसाकाठी पन्नास ते साठ किलो लाल मिरचीची विक्री होते. मोठ्या शहरांच्या तुलनेत साताºयात मसाल्याचे दरही चाळीस टक्क्यांनी कमी आहेत.
- अशोक माने,
मिरची विक्रेता

Web Title:  What is the chaat chaat of village! Increasing demand among metros

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.