मोबाइल चोरीला गेलाय? तर सर्वात आधी हे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 02:52 PM2021-12-02T14:52:24+5:302021-12-02T14:56:54+5:30
आपला मोबाइल चोरी गेल्यानंतर नेमके काय करावे हे अनेकांना माहिती नसते. त्यामुळे काहीजण मोबाइलच्या किमतीवर तक्रार द्यायची की नाही हे ठरवतात. मात्र, तक्रार न दिल्यामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात.
सातारा: जिल्ह्यामध्ये अलीकडे मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आपला मोबाइल चोरी गेल्यानंतर नेमके काय करावे हे अनेकांना माहिती नसते. त्यामुळे काहीजण मोबाइलच्या किमतीवर तक्रार द्यायची की नाही हे ठरवतात. मोबाइलची किंमत अगदी किरकोळ असली तर तक्रार देत नाहीत आणि महागडा मोबाइल असेल तर तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देतात. तक्रार न दिल्यामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आपला मोबाइल चोरी गेल्यानंतर पहिल्यांदा पोलीस ठाण्यात जावा अन्यथा पोलीस ठाण्याच्या वेबसाईटवर जाऊन तक्रार नोंदवा पण टाळाटाळ अथवा दुर्लक्ष करू नका. तक्रार देणे आपल्या नक्कीच फायद्याचे ठरेल.
पोलीस ठाण्यात जा किंवा ऑनलाइन तक्रार करा
यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला वेबसाईटवर जावे लागेल. येथे मोबाइल नंबर इएमआय नंबर आणि मोबाइल माहिती द्यावी लागेल. जेथे फोन हरवला किंवा चोरीला गेला त्या जागेचे नाव, जिल्हा, राज्य, पोलीस स्टेशन नंबर आणि फोन कधी हरवला त्याची तारीख द्यावी लागेल, तुमचे नाव आणि पत्ता टाका. यानंतर आधार कार्ड. अपलोड करून सबमिट करा. फोनची माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला कळवले जाईल.
वर्षभरात ३६ चोरीला गेले सापडले २४
गेल्या वर्षभरात जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मोबाइल चोरीच्या घटना घडल्या. त्यापैकी वर्षभरात ३६ मोबाइल चोरीला गेले त्यामध्ये केवळ १४ सापडले आहेत. अनेक जण तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे मोबाईल चोरीची संख्याही यापेक्षा अधिक आहे. त्यातच वर्षभरापासून कोरोना असल्यामुळे काही महिने लाॅकडाऊन पण होता. परिणामी सर्वच चोरीचे प्रकार आटोक्यात आली होते.
आयएमईआय ब्लॉक करा
संबंधित कंपनीशी आपण मोबाइल हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर संपर्क साधावा त्यांना वस्तुस्थिती सांगितल्यानंतर ते आपला मोबाईल ब्लॉक करतात. जेणेकरून चोरट्याला मोबाईलचा वापर करता आला नाही पाहिजे यासाठी आपण प्रयत्न राहिले पाहिजेत.
सर्व पासवर्ड बदला
यदा कदाचित जर चोरट्याने मोबाईल सुरू केला तर आपल्या मोबाईल मध्ये असलेले बँकेचे पासवर्ड त्याच्या हाती जातील त्यामुळे तत्काळ ¦गुगल डॅश बोर्डवर जाऊन आपले मेल आयडी ओपन करा. त्यानंतर त्यामधून फाॅरमॅट मारा.
जिल्ह्यातील मोबाईल चोरी
महिना मोबाईल चोरी
जानेवारी २
फेब्रुवारी ४
मार्च ३
एप्रिल ०
मे ०
जून ०
जुलै ६
ऑगस्ट ४
सप्टेंबर ८
ऑक्टोबर ४
नोव्हेंबर ५