राणीसाहेबांच्या साम्राज्यात काय वर्णावा महिलांचा थाट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:50 PM2017-08-02T16:50:03+5:302017-08-02T16:50:03+5:30
सातारा : मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाºया साताºयात लढवय्या सैनिकांची परंपरा तशी खूप जुनी. ढाल अन् तलवारींचा इतिहासही अजिंक्यताºयाच्या पायथ्याशी अनेक शतकांपासून लिहिला गेलेला; परंतु गेल्या काही महिन्यांपासून या साताºयात ‘महिला राज’ सुरू झाल्याचं स्पष्टपणे जाणवू लागलंय. ‘राणीसाहेबांच्या साम्राज्यात काय वर्णावा महिलांचा थाट?’ असंही मोठ्या कौतुकानं जुन्या-जाणत्या पेठांमध्ये विचारलं जावू लागलंय.
सातारा : मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाºया साताºयात लढवय्या सैनिकांची परंपरा तशी खूप जुनी. ढाल अन् तलवारींचा इतिहासही अजिंक्यताºयाच्या पायथ्याशी अनेक शतकांपासून लिहिला गेलेला; परंतु गेल्या काही महिन्यांपासून या साताºयात ‘महिला राज’ सुरू झाल्याचं स्पष्टपणे जाणवू लागलंय. ‘राणीसाहेबांच्या साम्राज्यात काय वर्णावा महिलांचा थाट?’ असंही मोठ्या कौतुकानं जुन्या-जाणत्या पेठांमध्ये विचारलं जावू लागलंय. त्याचं असं झालं की सातारा पालिकेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी यंदा शाहू कला मंदिरात सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आलेला. याचं उद्घाटन दिपप्रज्वलनानं झालं, तेव्हा व्यासपीठावरची गर्दी पाहून समोरचे प्रेक्षकही क्षणभर चाट पडले; कारण उपनगराध्यक्ष राजू भोसले वगळता वर साºया महिलाच महिला. अबब... त्याही किती म्हणाव्यात... तब्बल अकरा ! बिच्चारे एकटे उपनगराध्यक्ष मात्र, या सर्व महिलांच्या गराड्यात स्वत:ला आक्रसून घेताना पाहून प्रेक्षकांचं भलतंच मनोरंजन झालं. नगराध्यक्षा माधवी कदम, महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता फाळके यांच्यासह अनेक आजी माजी नगरसेविका या कार्यक्रमात मोठ्या हिरीरीनं पुढाकार घेत होत्या. विशेष म्हणजे, सातारा विकास आघाडीनं यंदा प्रथमच स्मिता घोडके यांच्या रूपातून एका महिलेला पक्ष प्रतोद पदाची जबाबदारी दिलीय. गेल्यावर्षी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची निर्विवाद सत्ता आल्यानंतर पालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्याचं कार्य उदयनराजेंच्या पत्नी स्वत: दमयंतीराजे भोसले करीत आहेत. तसंच ‘जलमंदिर’मधून खुद्द राजमाता कल्पनाराजे भोसले याही पालिकेच्या राजकारणावर बारीक लक्ष ठेवून. त्यामुळंच की काय, सातारा पालिकेमध्ये ‘राणीसाहेबांच्या साम्राज्यात काय वर्णावा महिलांचा थाट?’ असा सवाल सारेच पुरूष खाजगीत एकमेकांना विचारू लागलेत. |