मल्टिस्टेट म्हणजे काय रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:39+5:302021-06-10T04:26:39+5:30

सहकार तत्त्वावर कृष्णा साखर कारखाना उभा राहिला. त्याच्या जोडीने सहकारी तत्त्वावर शेतीपूरक उद्योग उभे राहिले. या उद्योगांचे काय झाले, ...

What is multistate, bro? | मल्टिस्टेट म्हणजे काय रे भाऊ?

मल्टिस्टेट म्हणजे काय रे भाऊ?

Next

सहकार तत्त्वावर कृष्णा साखर कारखाना उभा राहिला. त्याच्या जोडीने सहकारी तत्त्वावर शेतीपूरक उद्योग उभे राहिले. या उद्योगांचे काय झाले, याचा सातबारा प्रत्येक निवडणुकीत वाचला जातो. १९८९ पासून मोहिते आणि भाेसले बंधू सहकाराचा मुद्दा घेऊन लढत असतात. विरोधकांनी कारखाना कसा खाल्ला, याची उदाहरणे देतात. कारखाना सभासदांना विश्वासात घेऊनच चालवला पाहिजे, असे जाणकारांचे मत आहे.

यंदा सहकार पॅनलचे प्रमुख डॉ. सुरेश भाेसले सांगतात की, यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील, जयवंतराव भाेसले यांचा आदर्श घेऊन आपण निवडणुकीत उतरलो आहोत. हे सांगत असताना कारकीर्दीत सहकाराला बळकटी दिल्याची उदाहरणे ते देतात. उसाला सर्वाधिक दर, मोफत साखर, कारखान्याचे अत्याधुनिकीकरण, ऊस उत्पादनवाढीला चालना, अत्याधुनिक ऊसतोडणी यावर भर देऊन सभासदांना सहकाराचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

रयत पॅनलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांची राळ उडवली आहे. कारखान्याचे खासगीकरण, कृष्णा मेडिकल ट्रस्टमधील भ्रष्टाचार, सहकार चळवळ मोडीत काढणे, राजकीय पक्ष सहकारात आणणे आदी आरोप घेऊन ते सभासदांपुढे जात आहेत.

संस्थापक पॅनलचे प्रमुख अविनाश मोहिते सहकार पॅनलच्या नेत्यांवर कारखाना खासगीकरणाकडे नेत असल्याची टीका करतात. यामध्ये खासगी जयवंत शुगरला झुकते माप आणि कृष्णेला दुय्यम स्थान, सभासदांना सहकारातून हाकलून देण्याचा डाव, अन्यायकारक ऊसतोड, खोट्या केसेसवर अनाठायी खर्च, मोफत साखेरचा दिखाऊपणा यावर ते बोट ठेवत आहेत. संस्थापक पॅनलने आरोग्य उपचार सुविधा अमलात आणणार असल्याचा नवीन मुद्दा चर्चेत आणला आहे.

तिन्ही पॅनलचे प्रमुख सहकाराचा मुद्दा पुढे करत प्रचाराला लागले असले तरी मल्टिस्टेटच्या नावाखाली सहकाराचे खासगीकरण करण्याचे डाव सुरू असण्यावर कडाडून आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

- अशोक पाटील, इस्लामपूर

Web Title: What is multistate, bro?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.