पंजा नसताना मनगटाला विळा बांधून भात काढणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:51 PM2018-11-21T22:51:10+5:302018-11-21T22:51:16+5:30

सागर चव्हाण। लोकमत न्यूज नेटवर्क पेट्री : शरीराने धडधाकट असलेल्या व्यक्तींवर जेव्हा शेतात राबण्याची वेळ येते तेव्हा ते या ...

When the paw is not clamped in a wrist and paddy husk | पंजा नसताना मनगटाला विळा बांधून भात काढणी

पंजा नसताना मनगटाला विळा बांधून भात काढणी

googlenewsNext

सागर चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
पेट्री : शरीराने धडधाकट असलेल्या व्यक्तींवर जेव्हा शेतात राबण्याची वेळ येते तेव्हा ते या कामातून अंग काढून घेतात. परंतु ज्याच्या एका हाताला पंजाच नाही, असा व्यक्ती जर शेतात राबत असेल तर याला नवलच म्हणावं लागंल. शिवा श्रीरंग गोरे या युवकाला आपल्या डाव्या हाताचा पंजा अपघातात गमवावा लागला. मात्र, त्याने हार मानली नाही. त्या हाताला विळा बांधून तो शेतातील कामे करीत असून, स्वत:सह कुटुंबाची गुजराण करीत आहे. त्याचा हा संघर्ष अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.
जावळी तालुक्यातील कुसुंबीमुरा हे शिवा गोरे याचे गाव. या गावातच त्याचा जन्म झाला. शिवा जेव्हा सहा महिन्यांचा होता, तेव्हा त्याच्या डाव्या हाताचा पंजा घरातील चुलीत भाजला गेला. शिवाच्या रडण्याने आई व कुटुंबीयांना मोठं दुख: झालं. मात्र, पुढे आणखीन एक धक्का त्याच्या कुटुंबीयांना बसणार होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्या डाव्या हाताचा पंजा मनगटापासून काढून टाकण्यात आला.
घरची परिस्थिती बेताची असल्याने शिवाचे कुटुंब या धक्क्यातून कसंबसं सावरलं. आपल्याला एका हाताचा पंजा नाही, याचे कुटुंबीयांनी त्याला कधीच वाईट वाटू दिले नाही. संकटे येत गेली व त्यातून शिवाचं कुटुंब मार्ग काढत गेलं. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक कुसुंबीमुरा येथे पूर्ण करून आज शिवाने वयाची पंचवीशी गाठली असून, तो साताऱ्यातील एका महाविद्यालयात पदवीच्या तिसºया वर्षात शिकत आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने तो हॉटेलमध्ये नोकरी करून शिक्षण घेण्याबरोबरच आपल्या कुटुंबाला हातभारही लावत आहे. वर्षभरापूर्वीच तो विवाहबंधनात अडकला.
आज वार्ध्यक्यामुळे त्याच्या आई-वडिलांना शेतातील कामे पूर्वीसारखी करता येत नाहीत, त्यामुळे एका हाताचा पंजा नसतानाही शिवा आपल्या आई-वडिलांना शेती कामात मदत करतो. सध्या कुसुंबीमुरा परिसरात भात काढणीची लगबग सुरू आहे. मजुराकडून हे काम करून घ्यायचं म्हटलं की पुन्हा त्याच्या मजुरीचा प्रश्न आलाच. त्यामुळे शिवा जसा वेळ मिळंल तसा डाव्या हाताच्या मनगटाला विळा बांधून शेतात भात काढणी करतो. गेल्या अनेक दिवसांपासून त्याची ही धडपड सुरू असून, शिवाची ही संघर्षगाथा अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे. ‘हाताला पंजा नसला म्हणून काय झालं, परिस्थितीने संकटांचा सामना करण्याचं बळ सर्वांना दिलंय, फक्त ते ओळखता आलं पाहिजे,’असं शिवा छाती ठणकावून सांगतो.
हॉटेलची भांडीही घासली; वेटर म्हणून कामही केले
शिवाने आतापर्यंत हॉटेलमध्ये भांडी घासण्याबरोबरच वेटरचे कामही केले आहे. एका महाविद्यालयात तो अत्यल्प मानधनावर शिपाई म्हणूनही काम करतो. ही कामे करत असताना तो शिक्षणही घेत आहे. या सर्व व्यापातून सुटी मिळाली की शिवा गावी येऊन शेतातील सर्व कामे करतो. कायमस्वरुपी कामाच्या शोधात असणारा शिवा जीवनाशी संघर्ष करत मिळेल ते काम सफाईदारपणे करण्याचा प्रयत्न करीत आहे.

Web Title: When the paw is not clamped in a wrist and paddy husk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.