जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील...............विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:49 AM2021-06-16T04:49:48+5:302021-06-16T04:49:48+5:30

बातमी पाहून घेणे.............................................. सातारा : इयत्ता नववीमध्ये सन २०१९-२० मध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण .... मुले-मुली उत्तीर्ण झाली; मात्र त्यापैकी ...

Where did the ninth class students of the district go? | जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील...............विद्यार्थी गेले कुठे?

जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील...............विद्यार्थी गेले कुठे?

Next

बातमी पाहून घेणे..............................................

सातारा : इयत्ता नववीमध्ये सन २०१९-२० मध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण .... मुले-मुली उत्तीर्ण झाली; मात्र त्यापैकी ... इयत्ता दहावीमध्ये प्रवेश झाले. त्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले. उर्वरित .... विद्यार्थ्यांनी अर्जच भरले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी गेले कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून शाळा बंद झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्याने इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना अंतिम (वार्षिक) परीक्षा घेता आली नाही. त्यामुळे त्यांना पुढील वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला. दोन घटक चाचणी आणि सहामाही परीक्षेतील गुणांच्या आधारे इयत्ता नववीतील एकूण .... विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून त्यांना दहावीच्या वर्गामध्ये प्रवेशित करण्यात आले. त्यापैकी पुढे ..... विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरून नोंदणी केली. त्यामध्ये .... मुले, तर .... मुली आहेत. उर्वरित .... विद्यार्थ्यांची पुढे दहावीमध्ये नोंदच झालेली नाही. कौटुंबिक अडचण, नोकरीनिमित्त पालकांचे स्थलांतर, इअर ड्रॉप आदी कारणांमुळे या विद्यार्थ्यांनी शिक्षण थांबविले असल्याचे दिसून येते.

पॉइंटर

जिल्ह्यातील नववी उत्तीर्ण (पास) विद्यार्थी : ....

दहावीसाठी अर्ज केलेले विद्यार्थी : .....

पटसंख्येचा घोळ

इयत्ता नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण (नापास) केले जात नाही. त्यामुळे इयत्ता पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी हा मध्येच शाळाबाह्य झाला तरी पटसंख्येसाठी तसे दाखविले जात नाही.

कौटुंबिक अडचण, नोकरीमुळे स्थलांतर

१) कुटुंबातील आई-वडिलांचे आजारपण, विवाह आदी अडचणींमुळे इयत्ता नववीनंतर काही मुलींचे पुढील शिक्षण थांबले.

२) परराज्य, जिल्ह्यातून रोजगार, नोकरीनिमित्त साताऱ्यात आलेले अनेक जण कोरोनामुळे बेरोजगार झाले. त्यांनी रोजगारासाठी अन्य जिल्ह्यांत, राज्यामध्ये स्थलांतरण केल्याने काही विद्यार्थ्यांना दहावीमध्ये प्रवेशित होता आले नाही.

३) दहावी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे वर्ष आहे; पण यंदा कोरोनामुळे शिक्षणाचे वेळापत्रक आणि स्वरूप बदलले आहे. ऑनलाइन शिक्षणातील मर्यादा, अभ्यास नीट होत नसल्याने या महत्त्वाच्या वर्षामध्ये कमी गुण मिळतील, अशी भीती काही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी यंदा इअर ड्रॉप घेऊन पुढील वर्षी जोमाने परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वरूपातील कारणांमुळे दहावीमध्ये गेल्या वर्षी अनेक विद्यार्थी प्रवेशित झाले नसल्याची शक्यता असल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगतात.

प्रतिक्रिया

१. कोरोनामुळे गेल्या वर्षी सहामाही, घटक चाचणीतील गुणांच्या आधारे इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी पुनर्परीक्षा घेण्यात आली. रोजगार, नोकरीनिमित्त अन्य जिल्हा, राज्यात स्थलांतरित झाल्याने अधिकतर विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरले नसल्याची शक्यता आहे.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी

Web Title: Where did the ninth class students of the district go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.