एसटी चालवताना चालकाला आली चक्कर, एसटी शेतात घुसून 43 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 03:40 PM2017-08-21T15:40:54+5:302017-08-21T18:49:25+5:30

एसटी चालकाला चक्कर आल्यामुळे बस शेतात घुसल्याचे वृत्त समोर आले आहे.  साताऱ्यातील फलटण तालुक्यातल्या राजाळी गावाजवळ हा अपघात घडला.

While driving the ST, the driver came in a lot, and 43 people were injured in the ST field | एसटी चालवताना चालकाला आली चक्कर, एसटी शेतात घुसून 43 जण जखमी

एसटी चालवताना चालकाला आली चक्कर, एसटी शेतात घुसून 43 जण जखमी

Next

सातारा,दि. 21 -  एसटी चालकाला चक्कर आल्यामुळे बस शेतात घुसल्याचे वृत्त समोर आले आहे.  साताऱ्यातील फलटण तालुक्यातल्या राजाळी गावाजवळ हा अपघात घडला.  या अपघातात बसमधील 43 प्रवाशांना दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.   राजाळे गावाजवळ आल्यानंतर एसटी चालकाला चक्कर आली. त्यामुळे त्याचा पाय एक्सलेटरवर दाबला गेला आणि बस शेतात घुसली. पन्नास फुटावर गेल्यानंतर एसटी उलटली.
या अपघातानंतर एसटीतील प्रवासी घाबरले होते. एसटी उलटल्यामुळे एसटी चालक-वाहकासह 43 जण जखमी झाले.  जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.  

Web Title: While driving the ST, the driver came in a lot, and 43 people were injured in the ST field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात