थेंब थेंब साचवून श्रीमंत होतायंत ब्लड बँका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:10 PM2018-04-11T23:10:31+5:302018-04-11T23:10:31+5:30

While dropping drops drops, rich in blood banks | थेंब थेंब साचवून श्रीमंत होतायंत ब्लड बँका

थेंब थेंब साचवून श्रीमंत होतायंत ब्लड बँका

Next

संजय पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : आर्थिक बँका पैसा घेतात आणि गरजवंताला पैसाच पुरवितात; पण ‘ब्लड बँके’त दात्याकडून रक्त संकलित करून गरजवंताला ‘जीवदान’ देण्याचे काम केले जाते. सध्या रक्तदात्यांची संख्या वाढत असल्याने या बँकाही ‘श्रीमंत’ होतायंत. कºहाडच्या शासकीय रक्तपेढीत वर्षभरात सरासरी हजारहून अधिकजण रक्तदान करीत असून, त्या रक्ताच्या पिशवीमुळे अनेकांना जीवदान मिळतंय, हे २ि२२वशेष.
महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच या महागाईचा फटका रुग्णांनाही बसत आहे. शासकीय व अशासकीय रक्तपेढ्यांमधून दिले जाणारे रक्त काही महिन्यांपासून महागले आहे. प्रक्रिया खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ झाली असून, त्याबाबतचे अध्यादेश सर्वच रक्तपेढ्यांना देण्यात आले आहेत. अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती, डेंग्यू, सर्पदंश, मलेरिया, लेप्टोस्पायरा, कॅन्सर यासह अन्य रुग्णांना रक्ताची नितांत गरज असते. ही गरज भागविण्यासाठी ठिकठिकाणी शासकीय व अशासकीय रक्तपेढ्या कार्यरत आहेत. या रक्तपेढ्यांमध्ये विविध गटांचे रक्त उपलब्ध असते. मात्र, ते घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात. यापूर्वी शासकीय पेढीमधून ‘व्होल ब्लड’ची पिशवी ४५० रुपयांना दिली जात होती तर अशासकीय पेढ्यांमध्ये तिची किंमत ८५० रुपये एवढी होती. मात्र, दरवाढीनंतर या पिशवीसाठी शासकीय पेढीत १ हजार ५० व अशासकीय पेढीमध्ये १ हजार ४५० रुपये मोजावे लागतायत. तसेच अशासकीय पेढ्यांमध्ये मिळणाऱ्या ‘पॅक्ड रेड सेल्स’, ‘प्लाझ्मा’, ‘प्लेटमेट’, ‘क्रायो’च्या पिशव्यांसाठीही जादा पैसे द्यावे लागत आहेत.
यापूर्वी आकारण्यात येणारे दर २००८ मध्ये ठरविण्यात आले होते. मात्र, त्याबाबतचा अध्यादेश २०१२ मध्ये अशासकिय पेढ्यांना देण्यात आला. त्यामुळे २००८ ते २०१२ पर्यंत पेढ्यांमधून रक्ताच्या पिशवीसाठी सरासरी दराची आकारणी करण्यात येत होती. २०१२ मध्ये अध्यादेश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार दर आकारणी होऊ लागली. अशासकीय रक्तपेढ्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर चालविल्या जातात. मात्र, २००८ मध्ये ठरविण्यात आलेला दर परवडणारा नसल्यामुळे अशासकीय रक्तपेढ्या चालकांनी एकत्रित येऊन याबाबत नागपूर न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. रक्ताचे दर ठरविण्यासाठी न्यायालयाने एक समिती नेमल्यानंतर संबंधित समितीने रक्ताच्या पिशवीची किमान किंमत १ हजार ३०० रुपये करण्याची शिफारस राज्य शासनाला केली. राज्य शासनाने हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविला. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने सुधारित सेवाशुल्काला मान्यता दिल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने त्याबाबतचे नवे परिपत्रक सर्व शासकीय व अशासकीय रक्तपेढ्यांना पाठविले. त्यामुळे गत काही महिन्यांपासून रक्ताचे दर वाढले आहेत.
एकीकडे रक्ताचे दर वाढले असताना दुसरीकडे रक्तदात्यांची संख्याही वाढत असल्याचे निदर्शनास येत असून ही बाब निश्चितच समाधानकारक आहे.
का झालंय रक्त महाग?
प्रक्रिया खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ झाल्याचे रक्तपेढी चालकांकडून सांगण्यात येते. एखाद्याने रक्तदान केल्यानंतर त्या रक्ताची तपासणी करून प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी आवश्यक असणाºया पिशवीची किंमत साधारणपणे ४५० रुपये आहे. तसेच तपासणी किटची किंमत २५० रुपयापर्यंत आहे. वीजबिल, कर्मचाºयांचे पगार व यंत्रसामग्रीची देखभाल, दुरुस्तीसाठी येणारा खर्चही जास्त आहे. त्यामुळे जुन्या दरातून रक्तपेढी चालविणे अशक्य होते. प्रक्रिया खर्च वाढल्यामुळेच रक्ताच्या पिशवीचे दर वाढले आहेत, असे अशासकीय रक्तपेढी चालक सांगतात.
संकलित रक्ताच्या चाचण्या...
रक्तपेढ्यांमध्ये दान केलेल्या रक्ताचा गट पेढीकडून निश्चित केला जातो. त्यानंतर रक्ताच्या चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांनंतर रक्त रक्तपेढ्यांमधून वेगळं केलं जातं. काहीवेळा रक्तातील विविध घटक वेगळे केले जातात. फ्रेश फ्रोजन प्लाज्मा, पॅकलेस ब्लड, सिरम आदी घटक यावेळी वेगवेगळे केले जातात.
कोण करू शकते रक्तदान ?
१. अठरा ते साठ वयोगटांतील कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. निरोगी शरीर एवढाच निकष रक्तदात्यासाठी असतो.
२. रक्तदान करताना सर्वात आधी रक्तदात्याची शारीरिक२२ङ्म तपासणी केली जाते. तसेच घेतलेल्या रक्ताची घनता आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासले जाते.
३. कोणताही व्यक्ती रक्तदान करणार असल्यास त्याला रक्तपेढीकडून एक प्रश्नावली व संमतीपत्र दिले जाते.
४. रक्तदात्याची जीवनपद्धती, आवड, आहार, आजार याविषयीचे प्रश्न संबंधित प्रश्नावलीमध्ये असतात.
५. महिलांसाठीच्या प्रश्नावलीत वैयक्तिक माहितीसह अन्य काही प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला असतो.
६. साधारणपणे ४५ किलो वजन असणाºया व्यक्तीचे ३५० एमएल व ५५ किलो वजन असणाºयाचे ४५० एमएल रक्त घेतले जाते.

Web Title: While dropping drops drops, rich in blood banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.