१५ दुष्काळी गावे म्हणतायंत, ‘टँकर म्हणजी काय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:08 AM2018-03-14T00:08:59+5:302018-03-14T00:08:59+5:30

सातारा : दरवर्षी ज्या गावांना डिसेंबर महिन्यातच टँकरची वाट पाहावयास लागायची, त्या ठिकाणी यंदा पाण्याची आबादी सल्याचं सुंदर चित्र दिसू लागलंय. ही किमया घडलीय लोकसहभागातून पाणी साठविण्याच्या चळवळीमुळे.

While saying drought-hit villages, 'what does tanker say' | १५ दुष्काळी गावे म्हणतायंत, ‘टँकर म्हणजी काय’

१५ दुष्काळी गावे म्हणतायंत, ‘टँकर म्हणजी काय’

googlenewsNext

नितीन काळेल ।
सातारा : दरवर्षी ज्या गावांना डिसेंबर महिन्यातच टँकरची वाट पाहावयास लागायची, त्या ठिकाणी यंदा पाण्याची आबादी असल्याचं सुंदर चित्र दिसू लागलंय. ही किमया घडलीय लोकसहभागातून पाणी साठविण्याच्या चळवळीमुळे. वॉटरकप स्पर्धेमुळे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील जलसाठे वाढून अनेक गावांचे पाणी टँकर बंद झाले आहेत. यामध्ये माण तालुक्यातील जवळपास १५ गावे ही वॉटर कपमधील सहभागामुळे सद्य:स्थितीत टँकरमुक्त झाली आहेत.

राज्यात तीन वर्षांपासून अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्यावर्षी या स्पर्धेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सातारा, बीड आणि अमरावती हे तीन जिल्हे या स्पर्धेत सहभागी होते. यामध्ये सातारा जिल्ह्यानेच अंतिम बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला होता.

कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने हा क्रमांक पटकावला होता. दुसºया स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे उतरले होते. तर ३० तालुक्यांतील सुमारे १२०० हून अधिक गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सातारा जिल्ह्याने दुसºया वर्षीही मोठ्या प्रमाणात व सक्रिय असा सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील ९६ गावे या स्पर्धेत उतरली होती. त्यामध्ये अधिक करून माण तालुक्यातील ३२ गावांचा सहभाग होता. जवळपास या सर्वच गावांमध्ये जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. वॉटर कप स्पर्धेच्या तिसºया टप्प्याची तयारी सुरू असून, यावर्षीही सातारा जिल्ह्यातील २०० च्यावर दुष्काळी गावांचा सहभाग राहणार आहे.

तीन वर्षांपासून सुरू असणाºया या स्पर्धेचा फायदा असा झाला की, दुष्काळी तालुक्यातील अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. उन्हाळ्यातील पिकांसाठीही उपलब्ध पाण्याचा वापर करता येत आहे. माण तालुक्यात तर वॉटर कप स्पर्धेंतर्गत मोठे काम झाले आहे. त्यामुळे जवळपास १५ गावांना यावर्षी टँकर सुरू करायला लागणार नाहीत. शिरवली, सत्रेवाडी, बिदाल, परकंदी, परतवडी, सुरुपखानवाडी, पिंगळी खुर्द, वाकी, जाशी, थदाळे, कारखेल, मोगराळे, अनभुलेवाडी आदी गावांचा त्यामध्ये समावेश आहे. यामधील कारखेल गावाला तर दरवर्षी डिसेंबर महिन्यातच टँकर सुरू करायला लागायचा. लोकांना पाण्यासाठी भटकंती करायला लागायची; पण यावर्षी तेथील चित्र बदलले आहे.

खटावमधील गाव टँकरमुक्त...
वॉटरकपमध्ये गेल्यावर्षी खटाव तालुक्यातील २८ गावांनी काम केले. त्यातील नागाचे कुमठे हे गाव टँकरमुक्त झाले आहे. यावर्षीही या गावाने या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तसेच इतर गावेही या स्पर्धेच्या माध्यमातून टँकरमुक्त होत आहेत.

 

Web Title: While saying drought-hit villages, 'what does tanker say'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.