घाटातील वळणावर पांढर्‍या रंगाची मलमपट्टी मागणीला वाटाण्याच्या अक्षता : खंबाटकीतील एस आकराचे वळण काढण्याची मागणी

By admin | Published: May 13, 2014 11:55 PM2014-05-13T23:55:40+5:302014-05-13T23:58:04+5:30

खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाट परिसरातील रस्त्यातील कामाच्या त्रुटीमुळे आणि अशास्त्रीय वळणामुळे वारंवार अपघात होत असतात.

White band dressing demands demanding turnover of S Sumber | घाटातील वळणावर पांढर्‍या रंगाची मलमपट्टी मागणीला वाटाण्याच्या अक्षता : खंबाटकीतील एस आकराचे वळण काढण्याची मागणी

घाटातील वळणावर पांढर्‍या रंगाची मलमपट्टी मागणीला वाटाण्याच्या अक्षता : खंबाटकीतील एस आकराचे वळण काढण्याची मागणी

Next

 खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाट परिसरातील रस्त्यातील कामाच्या त्रुटीमुळे आणि अशास्त्रीय वळणामुळे वारंवार अपघात होत असतात. या ठिकाणी योग्य त्या सुविधा पुरविल्या जाऊन कामातील चुका दुरुस्त केल्या जाव्यात. विशेषत: इंग्रजी एस आकाराचे घातक वळण काढण्यात यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी यांच्यामधून वारंवार झाली. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार यांनी या वळणावर केवळ पांढरे पट्टे ओढून तात्पुरती मलमपट्टी केली आहे. शिवाय लोकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखवून चक्क महामार्गाचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे. खंबाटकी घाट व बोगदा परिसरात मागील चार महिन्यात तब्बल २७ जणांना प्राण गमवावा लागला आहे. शेकडो प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. तर मागील वर्षी १७ जण मृत्यमुखी पडले तर १६१ जण जखमी झाले. विशेषत: एस वळणाचे अशास्त्रीय बांधकाम असल्याने मोठे ट्रेलर, जड वाहने वळणावर फसतात व हायवेवर मोठे अपघात होत असतात. धोकादायक वळण काढण्यात यावे, तसेच संरक्षक कठडे, योग्य ठिकाणी सूचना फलक, सुविधा पुरवाव्यात, यासाठी स्थानिक ग्रामस्थ, विविध पक्ष संघटना यांनी वारंवार आवाज उठविला. मोर्चे, आंदोलने आणि रास्ता रोको केले. मात्र तरीही हायवे प्राधिकरणाने याकडे दूर्लक्ष केले. एनएचआयच्या अधिकार्‍यांवर खंडाळा पोलीस ठाण्यात याबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यत आला. मात्र संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी आपली आडमुठी भूमिका बदलली नाही. सुविधा पुरविणे आणि धोकादायक वळण काढून टाकण्याऐवजी सहापदीकरणाचे काम तसेच सुरू ठेवले आहे. त्यामुळे अपघातावर नियंत्रण मिळविण्याऐवजी त्याचे प्रमाण अधिक वाढणार आहे. यामुळे लोकांच्या भावना तीव्र बनत आहे. खंबाटकी घाटातील बोगदा ओलांडल्यानंतरही अतिशय तीव्र वळण आहे. याशिवाय बोगद्यातही सुविधांचा अभाव आहे. या ठिकाणी फक्त सूचना फलक दाखविण्यापलिकडे ठेकेदारांनी कोणतीही तसदी घेतली नाही. रस्त्याच्या दुरुस्तीकडे अथवा संरक्षक कठडे बांधण्याकडे ठेकेदार व प्रशासन यांनी दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे आपली कार्यकुशलता दाखवत ठेकेदारांनी या रस्त्यावर केवळ पांढरे पट्टे मारले आहेत. ज्यामुळे वेगावर कोणतेही नियंत्रण येऊ शकत नाही. तरी संबंधितांनी लक्ष देऊन खंबाटकी घाटातील एस आकाराचे वळण काढावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: White band dressing demands demanding turnover of S Sumber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.