मागासवर्गीयांचे अनुदान लाटतंय तरी कोण ?

By admin | Published: January 30, 2015 09:55 PM2015-01-30T21:55:20+5:302015-01-30T23:15:49+5:30

निवड योग्य लाभार्थींची : गैरप्रकार नसल्याचा गटविकास अधिकाऱ्यांचा खुलासा

Who are the backers of the Backward Classes? | मागासवर्गीयांचे अनुदान लाटतंय तरी कोण ?

मागासवर्गीयांचे अनुदान लाटतंय तरी कोण ?

Next

फलटण : तालुक्यातील ग्रामीण भागातील मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात येणारी १५ टक्के अर्थिक अनुदान रक्कम पात्र लाभार्थीनाच मिळाली पाहिजे. अपात्र अनुदान वाटपाच्या तक्रारी होऊ लागल्या असल्याची धक्कादायक माहिती पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सत्तारुढ गटाचे सदस्य दिलीप अडसूळ यांनी उजेडात आणली. मात्र, मागासवर्गीयामध्ये अनेक जातींचे प्रवर्ग असून त्यांनाही याचा लाभ दिला जातो. त्यामुळे असा काही प्रकार होत नसल्याचा खुलासा गटविकास अधिकारी नीलेश काळे यांनी केला.सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती स्मीता सांगळे होत्या. उपसभापती पुष्पा सस्ते, पंचायत समिती सदस्य जिजामाला नाईक-निंबाळकर, सुनंदा शिंदे, विवेक शिंदे, विठ्ठल नाळे, अमरसिंह बुरुंगले यांच्यासह विविध शासकीय खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.१५ टक्के अनुदान गरजु आणि पात्र लाभार्थीना दिले जाते काय? वाटपाच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. असा सवाल अडसूळ यांनी केला असता. यावर गटविकास अधिकारी यांनी मागासवर्गीय म्हणजे केवळ एस. सी. नव्हे, तर यामध्ये एस.टी, एन. टी, ओबीसींचाही समावेश असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती असे अनुदान किंवा अन्य साहित्य देतात; मात्र मागासवर्गीयातील अन्य प्रवर्गातील पात्र लाभार्थींनाही याचा लाभ दिला जातो. केवळ अनुसूचित जातीतील घटकांनाच नव्हे. कारण आपल्याकडे तसा शासन आदेश आहे. त्याप्रमाणे संबंधित सर्वच ग्रामपंचायती त्या प्रमाणे वाटप करीत असल्याचा खुलासा केला. या खुलासाने अखेरचा विषयावर पडदा पडला.तालुक्यातील पीक परिस्थती चांगली असल्याचे सांगत शासनाचे जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वानीच सहकार्य करावे. टँकर मुक्त महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अनुषंगाने २२ गावांमध्ये काम सुरू असुन या कामांमध्ये स्वयंसेवी संस्था लोकांचा सहभाग वाढविण्याचे दृष्टिने प्रमाण चालु आहेत. २०१९ पर्यंत १२ हजार ४१९ कामे करावयाची असून यासाठी २२ हजार २६२ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. सध्या आपल्याकडे ७५-८० लाख उपलब्ध असल्याने कामे होणे अवघड असले तरी त्या दिशेने प्रयत्न करावे लागणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी डोईफोडे यांनी सभेतुन दिली. उन्हाळा सुरू झाला असून चारा टंचाई निर्माण होऊ नये या दृष्टीने कृषी खात्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, जलसंधारण, आरोग्य, एकात्मिक बालविकास सेवा योजना, संपूर्ण स्वच्छता, लघुपाट बंधारे, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार, इंदिरा आवास, पशुसंवर्धन पंचायत समिती कृषी आदी विभागांच्या कामांचा आढावा यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला.सभापती सांगळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिलीप अडसूळ यांनी आभार मानले, सभेस अधिकारी, कार्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

वनजमिनीवर अतिक्रमण
फलटण तालुक्यातील ७१ गावांमध्ये वन विभागाच्या जमिनी व पडीक जागा असल्याने अशा जमिनी व जागांवर लोकांनी वास्तव्याच्या माध्यमातून अतिक्रमण केले असून संबंधित ग्रामपंचायतीनी सर्व्हे करावा व तसे प्रस्ताव वनविभागाकडे पाठवून देण्याचे सहकार्य करावे; अन्यथा भविष्यात वनविभागाच्यावतीने कारवाई केली जाणार असल्याचा इशारा वनविभागाचे गजानन चव्हाण यांनी सभेत दिला. पंचायत समिती सदस्य दिलीप अडसूळ यांच्यासह अन्य सदस्य व गटविकास अधिकारी काळे यांनी याबाबत तोडगा काय काढता येईल, याबाबतचे वनअधिकारी चव्हाण यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Who are the backers of the Backward Classes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.