साताऱ्याचा खासदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:04 AM2019-04-23T00:04:43+5:302019-04-23T00:04:49+5:30

 सातारा । सातारा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी (दि.२३ एप्रिल) मतदान होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे ...

Who is the Satara MP? | साताऱ्याचा खासदार कोण?

साताऱ्याचा खासदार कोण?

googlenewsNext

 सातारा । सातारा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी (दि.२३ एप्रिल) मतदान होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे नरेंद्र पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, बहुजन समाज पार्टीचे आनंदा थोरवडे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दिलीप जगताप, सागर भिसे, शैलेंद्र वीर, अभिजित बिचुकले यांनी दंड थोपटले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उमेदवार कमी असल्याने प्रशासनाचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. साताºयाचा खासदार कोण असणार हे मतदारराजा आज ठरवणार आहे. उमेदवारांचे भविष्य आज मशीनबंद होणार आहे.

मतदानासाठी ‘सुटी’ जाहीर झाली
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २३ एप्रिल रोजी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ अन्वये अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने व आस्थापना वगळून सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेले दुकाने, आस्थापनामधील कर्मचाºयांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे सहायक कामगार आयुक्त यांनी कळविले आहे.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
मतदार यादीत
नाव कसे शोधाल?
ँ३३स्र२://ूीङ्म.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल
या संकेतस्थळावर गेल्यानंतर डाव्या बाजूला दिलेल्या
लिंकवरील इलेक्ट्रोल सर्च इंजिनवर क्लिक करा.
नावानुसार आणि आयडी कार्डनुसार इथे नाव तपासता येते.
नावानुसार तपासायचे असेल तर त्यावर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यानुसार किंवा विधानसभानुसार असे दोन पर्याय दिले आहेत.
विधानसभा मतदार संघानुसार नाव तपासायचे असेल तर त्यावर क्लिक करावे. जिल्हा, मतदारसंघ, नाव अशी माहिती टाकल्यानंतर सर्चवर क्लिक केल्यानंतर यादीतील तुमचे नाव दिसेल.
ँ३३स्र२://६६६.ल्ल५२स्र.्रल्ल
या संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्च युजर नेम इन इलेक्ट्रोल रोलवर क्लिक करा. राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल मे आपका स्वागत है, असे वाक्य झळकेल.
मतदान केंद्राची माहिती जाणून घेऊ शकता.
या माहितीची प्रिंटही काढता येते.
मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव शोधणे,
नावात, पत्त्यात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता.
बीएलओची माहितीही मिळू शकेल. निवडणूक अधिकाºयाची माहितीही यावर उपलब्ध आहे. कंटिन्यू या लिंकवर क्लिक केल्यानंतर दोन पद्धतीने नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे. नाव, वय, जन्मतारीख, राज्य, जिल्हा, जिल्हा विधानसभा क्षेत्र ही माहिती टाकल्यानंतर मतदार यादीत नाव शोधता येते. यासह मतदार ओळखपत्र क्रमांक टाकूनही नाव शोधता
येते.

काही गडबड झाली तर काय?
शहरातील कोणत्याही भागात मतदानाच्या वेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर अवघ्या पाच ते सात मिनिटांत शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ आणि एसआरपीएफची कंपनी तत्काळ धाव घेईल आणि स्थिती निर्माण करणाºयांवर कडक कारवाई करेल. मंगळवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत पोलीस अधीक्षक (आयपीएस) ते पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) असे सर्वच बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत.

Web Title: Who is the Satara MP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.