येऊन-येऊन येणार कोण? उद्या फैसला : सातारच्या खासदारकीबाबत रंगल्या पैजा
By admin | Published: May 15, 2014 12:21 AM2014-05-15T00:21:13+5:302014-05-15T00:23:05+5:30
सागर गुजर ल्ल सातारा सातार्यासह संपूर्ण देशात तब्बल नऊ टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीच्या
सागर गुजर ल्ल सातारा सातार्यासह संपूर्ण देशात तब्बल नऊ टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास राहिले असताना उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जेवणापासून रोख रकमेपर्यंत पैजा लावल्या आहेत. काहींना तर विजयाची पक्की खात्री आहे; मात्र मताधिक्क्य नेमके किती असणार यावरून चुरशीच्या गप्पा सुरु असलेल्या पाहायला मिळतात. या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले, पुरुषोत्तम जाधव, राजेंद्र चोरगे, अॅड. वर्षा माडगूळकर, पांडुरंग शिंदे, अशोक गायकवाड या दिग्गजांसह कधी नव्हे ते १८ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे १९९६ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता सातारा शहरासह जिल्ह्यात वर्तविली जात आहे. प्रत्येक उमेदवाराचे समर्थक आपल्या व्होट बँकेचे गणित करण्यात गुंतलेले पाहायला मिळतात. १८ उमेदवारांपैकी मोजके उमेदवार सोडले तर प्रत्येकाची वेगळी व्होट बँक जिल्ह्यात आहे. त्यामुळे कोणीही निवडून आले तरी अतिशय कमी मताधिक्क्य राहील, असा अंदाज काही जण व्यक्त करत आहेत. दरम्यान, स्थानिक पातळीवरील नगरपालिका, ग्रामपंचायत, विकास सेवा सेवा सोसायट्या व पतसंस्थांच्या कार्यालयांमध्ये उमेदवारांच्या जय-पराजयाच्याच गप्पा आता रंगू लागल्या आहेत. ‘पैज लावू सांगतो...कोण जिंकणार ते!’ यापासून ते ‘किती मताधिक्क्य मिळणार?’ यापर्यंत चर्चेला ऊत आला आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे गावांतील झाडांच्या पाराखाली बसून जिल्ह्यापासून दिल्लीपर्यंत गप्पा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीला कुठे दगाफटका झाला व कुठे वाढ झाली, याचेही गणित मांडले जात आहे. वास्तविक, मतमोजणीनंतरच खरं गणित बाहेर येणार असलं तरीही कोरड्या गप्पा जागोजागी रंगलेल्या दिसतात. देशात काँगे्रसचीच सत्ता राहणार की मोदी सरकार बाजी मारणार, आम आदमी पार्टीचे भविष्य कसे राहील, याबाबत राजकारणाची आवड असणारी मंडळी चवीने चर्चा करत आहेत. सातारा शहरात सार्वजनिक वाचनालयांमध्ये राजकीय बातम्याच मोठ्या आवडीने वाचल्या जात आहेत. ‘एक्झिट पोल’ने दर्शविलेल्या अंदाजांचे दाखलेही काही जण देत आहेत. विजयी उमेदवार ४ लाखांची ‘लीड’ घेतील, असं आश्चर्यकारक भाकितही काहीजण वर्तवत आहेत. त्याउलट १0 ते ११ हजार मतांनीच खासदार निवडून येतील, असा उलटा अंदाजही व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तव्यात भाकरीच टाकली नसल्याचे राजकीय भाष्य करत सातारच्या जागेबाबत संदिग्धता निर्माण केली होती. उदयनराजेंना पुन्हा उमेदवारी देण्यावरुन पक्षांतर्गत विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी आपला निर्णय काहीसा उशिरा जाहीर केला. उदयनराजेंनीही विविध पक्षांच्या प्रमुखांच्या गाठीभेटी घेऊन सर्वांनाच गाफील ठेवले. थोडक्यात काय, तर शरद पवारांचीच राजकीय खेळी यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा या निवडणुकीच्या निमित्ताने सातारा शहरासह कºहाड, पाटणमध्येही सुरु आहे. उदयनराजेंना मागील निवडणुकीत मिळालेले तीन लाखांचे मताधिक्य लक्षात घेऊन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनीही सातारची सुभेदारी आरपीआयचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्याकडे सोपविली. आरपीआयने सुरुवातीला संभाजी संकपाळ या मराठा उमेदवाराला पक्षात घेऊन बहुजन समाजाच्या एकीचा दिखावा केला; परंतु नंतर त्या उमेदवाराच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवून पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांना उमेदवारी दिली. आम आदमी पार्टीचे उमेदवार राजेंद्र चोरगे हे सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची तयारी करतील, अशी चर्चा असताना त्यांच्या खांद्यावर पक्षाने लोकसभेची निवडणूक लढविण्याची जबाबदारी दिली. त्यांनी सुरुवातीच्या काळात प्रचारात चांगलीच मुसंडी मारली होती. पुरुषोत्तम जाधवांना पक्षाने डावलल्यानंतर त्यांनी जोरदार प्रचार केला. वाईच्या ‘होम पीच’सह कºहाड-पाटण तालुक्यांत त्यांनी झंझावाती प्रचार केला. आता मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदानयंत्रांमधील वास्तव आणि ही उत्सुकता यांच्यात आता अंतर राहिले आहे फक्त २४ तासांचे!