महाआघाडी सरकार नक्की कोणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:25 AM2021-07-08T04:25:48+5:302021-07-08T04:25:48+5:30

कऱ्हाड येथे दलित महासंघाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस समतावादी महिला मंचच्या अध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे, ...

For whom exactly the Grand Alliance government | महाआघाडी सरकार नक्की कोणासाठी

महाआघाडी सरकार नक्की कोणासाठी

Next

कऱ्हाड येथे दलित महासंघाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस समतावादी महिला मंचच्या अध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे, राज्य सरचिटणीस प्रकाश वायदंडे, शंकरराव महापुरे, बाबासाहेब दबडे (कोल्हापूर), विकास बल्लाळ (सांगली), रमेश सातपुते (सातारा), प्रा. अमोल महापुरे यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील निवडक पदाधिकारी उपस्थित होते.

प्रा. सकटे म्हणाले, ‘राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाकडील दोनशे कोटींचा निधी ''सारथी'' या संस्थेकडे वळवून मागासवर्गीयांवर अन्यायच केला आहे. मराठा समाजासाठी सारथी संस्थेस सरकारने एक हजार कोटी रुपये द्यावे, पण गरिबांच्या तोंडचा हक्काचा घास काढून घेण्याचे पाप करू नका, असे आवाहन करीत दलित महासंघ दलित-मागासवर्गीयांच्या कर्जमाफीचा मुद्दा घेऊन राज्यभर आंदोलन करणार आहे.

त्याचबरोबर वाटेगावचे अण्णा भाऊंचे स्मारक जागतिक कीर्तीचे व्हावे, यासाठी लढा उभारणार आहोत. वाटेगावचे स्मारक हा मातंग समाजाच्या आणि मराठी भाषिकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राज्यातील महाआघाडी सरकारची मागासवर्गीयांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची इच्छाच नसल्याने व तशी मानसिकता नसल्याने महाआघाडी सरकार कोणासाठी? असा घणाघाती सवाल उपस्थित केला.

समतावादी महिला मंचच्या अध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे यांनी दलित महासंघाशी ज्यांचा संबंधच नाही अशा मंडळींनी दलित महासंघ-नेतृत्व-कार्यप्रणालीवर बोलणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी दलित महासंघाचे ३० वर्षांचे काम आणि आंदोलने यांचा लेखाजोखा मांडला.

कार्यक्रमास कऱ्हाड तालुकाध्यक्ष दिलीप सकटे, तानाजी वायदंडे, संतोष चव्हाण, शैलेश भिंगारदेवे, बाळासाहेब चव्हाण, राहुल वायदंडे, शबाना मुजावर,नगिना मांजरे, हर्षदा तडाखे, पूजा बल्लाळ, जाई वायदंडे यांच्यासह निवडक पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वितेसाठी हरिभाऊ बल्लाळ, सूरज घोलप, जयवंत सकटे, शंकर अवघडे यांनी परिश्रम घेतले. प्रा. दीपक तडाखे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश सातपुते यांनी आभार मानले.

फोटो

कऱ्हाड येथे दलित महासंघाच्या प्रा. डाॅ. मच्छिंद्र सकटे यांनी आयोजित बैठकीत मार्गदर्शन केले.

Web Title: For whom exactly the Grand Alliance government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.