लुटता कशाला फुकटच प्या ! माणिक अवघडे : किसान सभेचे निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:25 PM2018-05-03T23:25:35+5:302018-05-03T23:25:35+5:30
कऱ्हाड: ‘सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत.
कऱ्हाड: ‘सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. कवडीमोल भावात शेतमालाची विक्री करावी लागत आहे, अशा लुटणाऱ्या सरकारला व अधिकाऱ्यांना याचे काहीही देणे घेणे नाही. आमच्या दुधाला भाव नाही. दूध उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक करता मग त्यांना दूध देऊ. सरकार, शासनाच्या अधिकाऱ्यांनो लुटता कशाला फुकट प्या,’ असे प्रतिपादन किसान सभेचे व कॉमे्रड माणिक अवघडे यांनी केले.
भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ गुरुवारी येथील तहसील कार्यालयात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने दूधवाटप आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, दुपारी बारा वाजता येथील तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी दूध वाटप केले.
किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉमे्रड माणिक अवघडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात कॉम्रेड उदय थोरात, हणमंत हुलवान, कॉमे्रड अशोक यादव, जे. एस. पाटील, कुमार चिंंचकर आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. +
अधिकाऱ्यांना पाजले आंदोलकांनी दूध
शासनाच्या अधिकाºयांकडे दूध दरवाढीविरोधात अनेकदा निवेदने दिली तरी त्यांच्याकडून नुसती आश्वासनेच दिली जातात. आता दूध संघ, सरकारकडून दूध उत्पादक शेतकºयांची मोठी फसवणूक केली जात आहे. त्यामुळे अगोदर अधिकाºयांना दूध पाजू, असे सांगत येथील तहसील कार्यालयासमोर मांडलेल्या दुधातील टोपातून दूध काढत ते आंदोलकांनी अधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये जाऊन त्यांना पाजले.++
या आहेत प्रमुख मागण्या...
१. गायीच्या दुधाला २७ रुपये दर मिळावा.
२. वांग-मराठवाडी धरणग्रस्तांच्या संपादित जमिनीला बाजारभावाच्या पाच पट दर द्यावा.
३. देवस्थान जमीन कसणाºया शेतकºयांच्या नावे करावीत.
४. शेतीमालाला हमीभाव द्यावा.
५. शेतीपंपाला पुरेसा वीज पुरवठा करावा.