कोयना धरणग्रस्तांचा प्रश्न मुख्यमंत्री का सोडवत नाहीत? ६२ वर्षे संघर्ष, तिसरी पिढी उपोषणाला

By दीपक शिंदे | Published: March 17, 2023 08:50 AM2023-03-17T08:50:43+5:302023-03-17T08:51:47+5:30

गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या या लोकांना अधिवेशनानंतर तुमच्या प्रश्नाकडे पाहू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

why is the cm not solving the problem of koyna dam victims 62 years of struggle third generation on hunger strike | कोयना धरणग्रस्तांचा प्रश्न मुख्यमंत्री का सोडवत नाहीत? ६२ वर्षे संघर्ष, तिसरी पिढी उपोषणाला

कोयना धरणग्रस्तांचा प्रश्न मुख्यमंत्री का सोडवत नाहीत? ६२ वर्षे संघर्ष, तिसरी पिढी उपोषणाला

googlenewsNext

दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा :  जिल्ह्यातील कोयना धरणग्रस्तांचा प्रश्न गेल्या ६२ वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या या धरणग्रस्तांची तिसरी पिढी उपोषणाला बसली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या या लोकांना अधिवेशनानंतर तुमच्या प्रश्नाकडे पाहू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे ठीक आहे बाबांनो, आम्ही अधिवेशन संपेपर्यंत आंदोलनाला बसतो, असे म्हणत धरणग्रस्तांनी ठिय्या मांडला आहे. मुख्यमंत्री स्वत: या परिसरातील आहेत. असे असूनही ते कोयना धरण आणि अभयारण्यग्रस्तांचा प्रश्न सोडवू शकत नसतील तर कोण सोडविणार, असा सवाल आता धरणग्रस्त विचारू लागले आहेत.

-कोयना खोऱ्यातील ९,७५०, उरमोडी आणि तारळीतील प्रत्येकी १,५००, वांग मराठवाडीतील २,५००, धोम, कण्हेरमधील पाच हजार, तर महू हातगेघरमधील एक हजार कुटुंबे पुनर्वसनासाठी पात्र आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: why is the cm not solving the problem of koyna dam victims 62 years of struggle third generation on hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.