वाईचा कृष्णा घाट होणार जलपर्णीमुक्त

By admin | Published: July 8, 2017 02:08 PM2017-07-08T14:08:17+5:302017-07-08T14:08:17+5:30

लोकमतच्या वृत्ताची दखल : पालिकेकडून जलपर्णी हटविण्याचे काम सुरू

Wicha Krishna Ghat will become a water-less free waterfall | वाईचा कृष्णा घाट होणार जलपर्णीमुक्त

वाईचा कृष्णा घाट होणार जलपर्णीमुक्त

Next


आॅनलाईन लोकमत


पसरणी (जि. सातारा), दि. ८ : वाई येथील कृष्णा नदी पात्रालाजलपर्णीने विळखा घातला आहे. जलपर्णीमुळे नदी पात्र झाकोळले जात आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पालिका प्रशासनाच्या वतीने नदी पात्रातील जलपर्णी हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

दक्षिण काशी म्हणून वाई शहराची सर्वदूर ओळख आहे. कृष्णा घाटावर असलेले महागणपती मंदिर पुरातन असून, याठिकाणी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. महाबळेश्वर, पाचगणीला भेट देणारे अनेक पर्यटक देखील याठिकाणी देवदर्शनासाठी येतात.

पावसाळा सुरू होताच कृष्णा नदीपात्रात जलपणीर्ची वेगाने वाढ होते. गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी नदीपात्रात वेगाने वाढणाऱ्या जलपणीर्मुळे नदीच्या सौंदयार्ला बाधा पोहोचत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी लोकमतमध्ये ह्यवाईचा कृष्णा घाट जलपर्णीच्या विळख्यात या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.

या वृत्ताची दखल घेत पालिका प्रशासनाने नदी पात्रातील जलपर्णी हटविण्याचे काम हाती घेतले आहे. नदीपात्रातील जलपर्णी बुलढोझरच्या साह्याने हटविण्यात आल्या.


वाईच्या कृष्णा नदी पात्राला जलपर्णीचा विळखा
 

www.lokmat.com/storypage.php

 

नागरिक, भाविकांमधून कौतुक


लोकमतच्या वृत्ताची दखल घेत पालिका प्रशासनाच्या वतीने तातडीने जलपर्णी हटविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने भाविक व नागरिकांनी लोकमतचे कौतुक केले. कृष्णा नदी पात्रात दरवर्षी जलपणीर्चे प्रमाण वाढते. त्यामुळे प्रशासनाला दरवर्षी या जलपर्णी हटविण्यासाठी कसरत करावी लागते. नदीपात्रात जलपर्णी वाढू नये, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Wicha Krishna Ghat will become a water-less free waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.