वन्यप्राण्यांचा धुमाकूळ -अडीचशे एकरांत नुकसान : रानडुक्कर, गव्यांचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:16 AM2020-02-22T01:16:14+5:302020-02-22T01:17:36+5:30

दिवसभर राखणी करून आणि रात्रभरही जागता पहारा देऊन गवे व डुक्कर जुमानत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. काही शेतक-यांची शिवारे लांब आणि अडवळणीच्या ठिकाणी असल्याने रात्री तेथे राखणीला थांबणे शक्य होत नाही.

 Wildflowers haze | वन्यप्राण्यांचा धुमाकूळ -अडीचशे एकरांत नुकसान : रानडुक्कर, गव्यांचा उपद्रव वाढला

भोसगाव येथील ज्वारीचे पीक वन्यप्राण्यांनी फस्त करून भुईसपाट केले आहे.

Next

सणबूर : रानडुक्कर आणि गव्यांच्या कळपांनी ढेबेवाडी विभागातील भोसगाव येथील शेतशिवार परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. महिनाभरातच सुमारे अडीचशे एकरांतील रब्बी ज्वारीचे पीक त्यांनी फस्त केल्याचे वनविभागाकडे आलेल्या तक्रारीतून स्पष्ट होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची स्थिती आभाळ कोसळल्यासारखी झाली आहे.

वन्यप्राण्यांचा उपद्र्रवाने हैराण झालेल्या ढेबेवाडीतील डोंगर भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला रामराम ठोकल्याने पडीक क्षेत्र वर्षागणिक वाढत चालले आहे. जवळपास खाद्य उपलब्ध होत नसल्याने वन्यप्राण्यांनी आजूबाजूच्या सपाटीच्या गावांकडे मोर्चा वळविला आहे. तेथील शेती वाचवतानाही शेतकºयांच्या नाकीनऊ येत आहे. काळगाव परिसरात सध्या गव्यांचा तर ढेबेवाडी खोºयात रानडुकरांचा उपद्र्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रब्बी ज्वारीचे पीक काढणीला आले असतानाच शिवारेच्या शिवारे रातोरात फस्त होऊ लागल्याने तोंडचा घास हिरावल्यासारखी शेतकºयांची अवस्था झाली आहे. खरिपाच्या ऐन पीक काढणीच्या वेळेलाच झालेल्या अतिवृष्टीमुळे संकरित ज्वारीचे उभे पीक जागेवरच अंकुरल्याने शेतकºयांच्या सर्व आशा रब्बी ज्वारीवरच होत्या.

मात्र, वन्यप्राण्यांच्या उपद्र्रवाने हा हंगामही वाया गेल्याची शेतकºयांची भावना झाली आहे. दिवसभर राखणी करून आणि रात्रभरही जागता पहारा देऊन गवे व डुक्कर जुमानत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. काही शेतक-यांची शिवारे लांब आणि अडवळणीच्या ठिकाणी असल्याने रात्री तेथे राखणीला थांबणे शक्य होत नाही.


सकाळी पाहावे लागते उद्ध्वस्त पीक
शेतातील काम आटोपल्यानंतर शेतकरी घराकडे जातात. त्यावेळी पीक चांगले असते. मात्र दुसऱ्या दिवशी शेतात येताच शेतकऱ्यांना उद्ध्वस्त पीक पाहून धक्का बसतो. वन्यप्राणी रात्रीत पिकाची पूर्णत: नासाडी करतात.


खरिपातील ज्वारीचे पीक पावसामुळे हातातून गेल्याने सर्व आशा रब्बी ज्वारीवरच होत्या; पण काढणीला आठवडा उरला असतानाच एकरातील ज्वारीचे पीक रानडुकरांनी रातोरात फस्त केले.
- किरण देशमुख, नुकसानग्रस्त शेतकरी, भोसगाव


वनविभागाच्या कार्यालयाकडे पीक नुकसानीच्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पंचनामे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले जात आहेत.
- एस. एस. राऊत, वनपाल

 

Web Title:  Wildflowers haze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.