'मुलं मुलींकडे नाहीतर काय मुलांकडे बघणार का?' 'त्या' प्रश्नावर उदयनराजेंच बिनधास्त उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 09:07 PM2019-03-22T21:07:07+5:302019-03-22T21:10:10+5:30
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील एका महाविद्यालयात उदयनराजेंनी विद्यार्थींनींशी संवाद साधला.
सातारा - साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुलं मुलींकडे बघणार, नाहीतर काय मुलांकडे बघणार का ? असे म्हणत एका मुलीच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून उदयनराजेंनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळीही, त्यांच्यातील बिनधास्तपणा पाहायला मिळाला.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील एका महाविद्यालयात उदयनराजेंनी विद्यार्थींनींशी संवाद साधला. त्यावेळी, एका विद्यार्थीनीने टवाळ मुलांकडून मुलींची छेड छाड होत असल्याची तक्रार उदयनराजेंकडे केली. मुलं मुलींसमोर गाड्या आडव्या करतात. काही मुलं मुलींची छेड काढतात, अशी तक्रार या कॉलेजमधील युवतीने राजेंसमोर केली होती. त्यावर, उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, या प्रश्नावर काय उत्तर देऊ मलाच कळेना. मात्र, ही गोष्ट नॅचरल आहे, तुम्हाला थोडा त्रास होईल पण मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार ? असे म्हणत उदयनराजेंनी मुलीच्या प्रश्नावर बिनधास्त उत्तर दिले. पण, पुढे बोलताना, ही जर विकृती असेल तर त्यांना समजावून सांगू, असा विश्वासही मुलींना दिला. मात्र, उदयनराजेंच्या या उत्तरावर उपस्थित मुलांनी हसून आणि ओरडत दाद दिली.
आज सातारा शहरातील अनेक महाविद्यालयांना भेटी दिल्या व युवक युवतींशी विविध विषयांवर चर्चा केली, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांना करीयर विषयक मार्गदर्शन केले व त्यांच्या विविध मागण्या ऐकून त्या पूर्ण करण्याचा शब्द दिला.
युवासंवाद...
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) March 22, 2019
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक कॉलेज च्या विद्यार्थी मित्रांना भेटून आनंद झाला तसेच यावेळी वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली व मनमोकळया गप्पा रंगल्या. pic.twitter.com/czwdGbx4Gi
pic.twitter.com/yJ0juORjSH— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) March 22, 2019
युवासंवाद...
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) March 22, 2019
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक कॉलेज च्या विद्यार्थी मित्रांना भेटून आनंद झाला तसेच यावेळी वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली व मनमोकळया गप्पा रंगल्या. pic.twitter.com/czwdGbx4Gi