बावधनच्या यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 04:45 PM2020-03-13T16:45:53+5:302020-03-13T16:48:00+5:30
या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी तसे आदेश काढले होते. बावधन येथील यात्रा कमिटीशी चर्चाही करण्यात आली होती. मात्र, तरीही शुक्रवार, दि. १३ रोजी बावधनच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले
सातारा : कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सर्व यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले होते. या आदेशाचे उल्लंघन वाई तालुक्यातील बावधनच्या यात्रा कमिटीने केले असून, या यात्रा कमिटीवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधीक्षक सातपुते म्हणाल्या, ‘कोरोना विषाणूमुळे संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी तसे आदेश काढले होते. बावधन येथील यात्रा कमिटीशी चर्चाही करण्यात आली होती. मात्र, तरीही शुक्रवार, दि. १३ रोजी बावधनच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे यात्रा कमिटीवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील. नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा इथे प्रश्न नाही. परंतु कोरोनाचा संसर्ग एकमेकांना होऊ नये, म्हणून प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. गावातील चार ते पाच लोकांनी विधिवत पूजा करण्यास हरकत नाही. परंतु गर्दी जमविल्यामुळे कोरोनाचा धोका अधिक संभविण्याची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.’