फलटणमधील अतिक्रमणविरोधात न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:19+5:302021-06-30T04:25:19+5:30

फलटण : ‘फलटण नगरपालिकेच्या राजधानी टॉवरमधील अतिक्रमण विरोधातील लढाई संपली नाही. या प्रकरणात आपण न्यायालयात दाद मागणार आहे,’ असा ...

Will go to court against encroachment in Phaltan | फलटणमधील अतिक्रमणविरोधात न्यायालयात जाणार

फलटणमधील अतिक्रमणविरोधात न्यायालयात जाणार

Next

फलटण : ‘फलटण नगरपालिकेच्या राजधानी टॉवरमधील अतिक्रमण विरोधातील लढाई संपली नाही. या प्रकरणात आपण न्यायालयात दाद मागणार आहे,’ असा इशारा फलटण नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक जाधव यांनी दिला आहे.

अशोकराव जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून राजधानी टॉवर्सही इमारत बांधली गेलेली आहे. या इमारतीमध्ये काही व्यावसायिकांच्या आर्थिक फायद्यासाठी नियमबाह्य बदल केल्याचे आरोप फलटण नगर परिषदेमधील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केलेले होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देऊन उपोषणाला बसण्याचा इशाराही देण्यात आलेला होता.

त्यानुसार साताऱ्याचे सहायक नगररचनाकार यांनी राजधानी टॉवर्समधील त्या बांधकामाच्या पुढील कामास स्थगिती दिलेली होती. परंतु त्यानंतर सत्ताधारी गटाने थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला. राजधानी टॉवरमध्ये नियमानुसारच नगर परिषदेने बांधकाम केले असल्याबाबतची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांना यासंबंधी आदेश दिले. फलटण नगर परिषदेच्या राजधानी टॉवर्समधील त्या बांधकामाच्या स्थगिती आदेशालाच स्थगिती दिली. यानंतर अशोकराव जाधव यांनी पुढील भूमिका प्रसिद्धी पत्रकान्वये स्पष्ट केली.

पालिकेकडून केलेले बेकायदेशीर काम वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी गटाकडून सुरू साहे. एकीकडे शहरातील जनतेची अतिक्रमणे अमानुषपणे काढून त्यांना रस्त्यावर आणायचे आणि दुसरीकडे पालिकेचे बेकायदेशीर बांधकाम वाचवण्यासाठी नगरविकास मंत्रालयाचा स्थगिती आदेश जर ते आणत असतील तर हा फलटण शहरातील जनतेवर एकप्रकारे अन्यायच आहे. त्यामुळे या प्रकरणात आपण पालिकेचे मुख्याधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी, नगररचना सातारा व नगरविकास खाते या सर्वांविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. या सगळ्यांना पाठीशी घालणाऱ्या नगरसेवकांना घरी बसवणार असल्याचा, इशाराही अशोकराव जाधव यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.

Web Title: Will go to court against encroachment in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.