साताºयातील भिक्षेकºयांना स्वत:च्या पायावर उभं करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 11:39 PM2017-09-16T23:39:16+5:302017-09-16T23:39:36+5:30

 Will stand at the feet of saffron goddesses on their own feet | साताºयातील भिक्षेकºयांना स्वत:च्या पायावर उभं करणार

साताºयातील भिक्षेकºयांना स्वत:च्या पायावर उभं करणार

Next
ठळक मुद्देएका अवलिया डॉक्टरनं उचललं शिवधनुष्य; मोफत उपचार सुरूफुटपाथवरील गोरगरीब वयोवृध्द भिक्षेकºयांना ते मोफत गोळ्या-औषधे देतात.

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आर्थिक परिस्थिती अन् शारीरिक कमकुवतपणा यामुळे नाईलाजानं भीक मागणाºया साताºयातील भिक्षेकºयांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी जे-जे शक्य आहे, ते करणार आहोत, अशी माहिती डॉ. अभिजित सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मूळचे साताºयाचे डॉक्टर सोनवणे सध्या पुण्यात स्थायिक असून पुणे शहरातील भिक्षेकºयांसाठी त्यांनी सोहम ट्रस्ट स्थापन केला आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून फुटपाथवरील गोरगरीब वयोवृध्द भिक्षेकºयांना ते मोफत गोळ्या-औषधे देतात. वेळ पडल्यास त्यांना स्वत:च्या खर्चाने दवाखान्यात दाखल करून उपचाराचे बिल स्वत: भरतात.
केवळ वयोवृध्द भिक्षेकºयांवर मोफत उपचार करणारे डॉ. सोनवणे आता सातारा जिल्ह्यातही भिक्षेकºयांसाठी काम करणार
असून त्यासाठी त्यांनी सातारकरांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले
आहे.

आज ‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘भिक्षांदेही...’
साताºयाचे डॉक्टर सोनवणे यांना महाराष्टÑ शासनाच्या भिक्षेकरी प्रतिबंध विभागाने शासकीय मोहिमेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. केवळ बळजबरीने भिक्षेकºयांना फुटपाथवरून उचलून भिक्षेकरी गृहात डांबल्याने भिक्षा मागण्याची प्रवृत्ती थांबत नाही. त्यासाठी त्यांना आपुलकीनेच या दलदलीतून बाहेर काढले पाहिजे, अशी विनंती सोनवणे यांनी संबंधित खात्याला केली होती. सध्या या खात्यातर्फे सहा महिने विशेष मोहीम सुरू असून सामाजिक कार्यात आवड असणाºयांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही केले गेले आहे.

Web Title:  Will stand at the feet of saffron goddesses on their own feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.