तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार : रणजितसिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:24 AM2021-06-30T04:24:53+5:302021-06-30T04:24:53+5:30
फलटण : ‘फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असून, तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत,’ अशी माहिती खासदार रणजितसिंह ...
फलटण : ‘फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असून, तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत,’ अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते नांदल, फरांदवाडी, सांगवी या ठिकाणी विविध विकासकामांचा प्रारंभ करन्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, अभिजित नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सदस्या लताताई कोळेकर, बाळासाहेब काशीद, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव पोकळे, अमित रणवरे उपस्थित होते
रणजितसिंह म्हणाले, ‘फलटण तालुक्यातील जनतेने प्रचंड प्रेम केले आहे. त्या ऋणातून मुक्त होता येणार नाही; परंतु या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे. आपण टाकलेल्या खासदारकीच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी काम करीन. जनतेला कुठे कमीपणा येणार नाही, याचीही काळजी घेईल. तालुक्यामध्ये खासदार झाल्यानंतर विविध कामे मंजूर करून घेतली. त्यामध्ये नीरा-देवघरचा प्रश्न, फलटण पुणे रेल्वेचा प्रश्न, नाईकबोमवाडी औद्योगीकरण, सीतामाई घाट, धर्मपुरी ते लोणंदपर्यंतच्या कामासाठी लागणारा निधी तसेच शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांचा निधी, फलटण-आदर्की रस्ता मंजूर, फलटण ते शिंगणापूर शेनवडी मार्ग या कामासाठी राज्य व केंद्र शासनाकडून या तालुक्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, खासदार फंड, व्यायामशाळा, अंगणवाड्या व इतर सगळ्या गोष्टींसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सरडे येथील ऑलिम्पिक वीर, तालुक्याचा पुत्र प्रवीण जाधव याचे ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. त्याबद्दल त्या कुटुंबाच्या आई-वडिलांचा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी घरी जाऊन सत्कार केला. गावातील इतर मुली राज्य पातळीवर विविध खेळांमध्ये भाग घेत आहेत, त्यांचाही सत्कार या निमित्ताने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.