वीज कनेक्शन बंद केल्याने अभियंत्यासह वायरमनला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:26 PM2019-08-23T12:26:23+5:302019-08-23T12:26:53+5:30

वीज कनेक्शन बंद केल्याचा राग मनात धरून सहायक अभियांत्यासह वायरमनला मारहाण करण्यात आल्याची घटना कोडोली येथे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Wireman hit with engineer after shutting down power connection | वीज कनेक्शन बंद केल्याने अभियंत्यासह वायरमनला मारहाण

वीज कनेक्शन बंद केल्याने अभियंत्यासह वायरमनला मारहाण

Next
ठळक मुद्देवीज कनेक्शन बंद केल्याने अभियंत्यासह वायरमनला मारहाण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : वीज कनेक्शन बंद केल्याचा राग मनात धरून सहायक अभियांत्यासह वायरमनला मारहाण करण्यात आल्याची घटना कोडोली येथे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रमेश राजाराम निंबाळकर (रा. चुना भट्टीच्या पाठीमागे चंदननगर, कोडोली सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रमेश निंबाळकर यांचे घरगुती लाईट बील थकले होते. त्यामुळे हे वीज कनेक्शन बंद करण्यासाठी सहायक अभियंता प्रशांत यादव आणि वायरमन सुनिल गवळी हे दोघे त्यांच्या घरी गेले होते.

त्यावेळी निंबाळकर यांनी शिवीगाळ व दमदाटी करत यादव आणि गवळी यांना पत्र्याच्या सुफाने मारहाण केली. या प्रकारानंतर वायरमन गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन निंबाळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रमेश निंबाळकर यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत त्यांना अटक झाली नव्हती.

Web Title: Wireman hit with engineer after shutting down power connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.