साक्षी जांभळे, ऋतुजा कावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:45 AM2021-08-13T04:45:28+5:302021-08-13T04:45:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘साताऱ्याची माती खेळाडूंची माती आहे. या मातीतला खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जावर नाव कमवतो हे आपण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘साताऱ्याची माती खेळाडूंची माती आहे. या मातीतला खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जावर नाव कमवतो हे आपण खाशाबा जाधव, धावपटू ललिता बाबर यांच्या माध्यमातून पाहिले आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय रग्बीच्या सराव शिबिरासाठी निवड झालेल्या साक्षी जांभळे आणि ऋतुजा कावडे या दोन्ही खेळाडू साताऱ्याचे नाव उज्ज्वल करतील,’ असा विश्वास आमदार शिवेंद्रसिहंराजे यांनी व्यक्त केला.
ताश्कंद येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या १८ वर्षांखालील आशियाई रग्बी स्पर्धेसाठी भारतीय मुलींचा संघ सहभागी होत आहे. या संघाची निवड चाचणी दि. १३ ते १६ स्पटेंबरला होत असून, यासाठी देशभरातून ५४ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सातारा जिह्यातील साक्षी जांभळे आणि ऋतुजा कावडे यांचा समावेश आहे.
या निवडीबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले. यावेळी रुद्र्रनिलराजे, नगरसेवक धनंजय जांभळे, माजी नगराक्ष्यक्ष विजय बडेकर, अंकुश जांभळे, नितीन जांभळे, संपत जाधव, प्रतीक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : १२ साक्षी जांभळे
साक्षी जांभळे या खेळाडूचा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.