महिलेला विवस्त्र फोटो पाठविण्यास भाग पाडले, साताऱ्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 08:20 PM2022-12-07T20:20:49+5:302022-12-07T20:20:57+5:30
पीडित महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
सातारा: बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेला विवस्त्र फोटो पाठविण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली असून, याप्रकरणी एका तरूणावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विक्रांत शंकर जाधव (वय ३१, रा. खेड नांदगिरी, ता. कोरेगाव, जि.सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला आणि विक्रांत जाधव याची ओळख होती. एके दिवशी जाधवने पीडित महिलेच्या मोबार्इलवर फोन करून तिला धमकी दिली. ‘तुझ्या पहिल्या लग्नाच्या घटस्फोटाच्या केसमध्ये मी मदत केली आहे. आमचे शारीरिक संबंध आले आहेत, असे खोटे सांगून तुझ्या सासरच्या तसेच सर्व ठिकाणी बदनामी करेन. हे होऊ द्यायचे नसेल तर तुझे खासगी फोटो पाठव.’असे विक्रांत जाधवने तिला सांगितले. आपली बदनामी होर्इल, याभितीने पीडित महिलेने टेलीग्राम अकांउटवरून तिचे खासगी फोटो पाठविले. मात्र, तरीही त्याचा त्रास काही कमी झाला नाही. त्यामुळे पीडित महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.