फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 02:16 PM2021-04-07T14:16:50+5:302021-04-07T14:22:20+5:30
Crime News Satara Police- फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी सोमनाथ शिवाजी भारती (वय २७, रा.बावधन ता.वाई) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी सोमनाथ शिवाजी भारती (वय २७, रा.बावधन ता.वाई) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित पीडित महिला ३० वर्षाची आहे. तक्रारदार व संशयित आरोपी सोमनाथ भारती या दोघांची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर काही दिवसांनी संशयिताने असलेल्या संबंधाचे फोटो महिलेला दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्या फोटोच्या आधारे संशयिताने पाचगणीसह विविध ठिकाणी हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला.
हा प्रकार आॅक्टोबर २०१९ ते जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये घडला. संशयिताने महिलेला फोटो व्हायरल करण्याची व ते फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी दिली. फोटो डिलीट करण्यासाठी महिलेच्या एटीएमवरुन ४८०० रुपये व गुगल पे वरुन १५, ५०० रुपये घेतले असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. संशयित आरोपी वारंवार धमकी देत असल्याने महिलेने अखेर शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सोमनाथ भारती याच्यावर अत्याचार व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.