ओढ्याला आलेल्या पुरात महिला वाहून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:29 AM2021-06-06T04:29:04+5:302021-06-06T04:29:04+5:30

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या काही भागाला शनिवारी दुपारपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सातारा तालुक्यातील मांडवे गावामध्ये ओढ्याला आलेल्या ...

The woman was swept away in the flood | ओढ्याला आलेल्या पुरात महिला वाहून गेली

ओढ्याला आलेल्या पुरात महिला वाहून गेली

Next

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या काही भागाला शनिवारी दुपारपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सातारा तालुक्यातील मांडवे गावामध्ये ओढ्याला आलेल्या महापुरात वाहून गेल्याने एका वृध्देचा मृत्यू झाला.

पुतळाबाई सुधाकर माने (वय ७१, रा. मांडवे) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. गावाजवळच्या ओढ्यात घटनास्थळापासून सुमारे १०० मीटर अंतरावर झाडात अडकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह मिळाला.

गेल्या ४ दिवसापासून सायंकाळच्या वेळेला सातारा शहरासह जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील मांडवे गावाजवळ ओढ्याला आलेल्या महापुरात ७१ वर्षांची वृद्धा वाहून जाऊन बेपत्ता झाली. ही महिला गुरे चारण्यासाठी शेतात गेली होती. पावसाची चिन्हे दिसू लागल्यामुळे तेथून परत येत असताना वाटेतच पावसाने गाठले आणि ओढ्यात वाहत जाऊन ती बेपत्ता झाली.

बोरगाव पोलिस व शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यु टीमच्या मदतीने पडत्या पावसात शोधकार्य़ हाती घेण्यात आले. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यु टीमचे तुषार पवार, सुजित पवार, संतोष वायदंडे, अमोल फणसे, केतन फणसे, अंकुश पवार यांनी परिश्रम घेतले.

_________________

Web Title: The woman was swept away in the flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.