बाईच्या जातीनं.. सोसावं जरा संसारासाठी विवाहितांची कुचंबणा : प्रत्येक पावलावर सहन करण्याचा विट आल्यावर मनस्तापातून होते कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:48 AM2018-04-22T00:48:42+5:302018-04-22T00:48:42+5:30

सातारा : पती-पत्नी संसाराची समान चाके आहेत, असे कितीही घसा फोडून कोणी सांगितले तरी वास्तवात घराघरांत ‘बाईच्या जातीनं सोसावं जरा संसारासाठी’ हे वाक्य ठरलेलं असतं.

Woman's breasts for women's life are: Desperation of marriages: Every act of deliberate acts | बाईच्या जातीनं.. सोसावं जरा संसारासाठी विवाहितांची कुचंबणा : प्रत्येक पावलावर सहन करण्याचा विट आल्यावर मनस्तापातून होते कृत्य

बाईच्या जातीनं.. सोसावं जरा संसारासाठी विवाहितांची कुचंबणा : प्रत्येक पावलावर सहन करण्याचा विट आल्यावर मनस्तापातून होते कृत्य

googlenewsNext
ठळक मुद्दे आत्महत्येची कारणमीमांसा

प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : पती-पत्नी संसाराची समान चाके आहेत, असे कितीही घसा फोडून कोणी सांगितले तरी वास्तवात घराघरांत ‘बाईच्या जातीनं सोसावं जरा संसारासाठी’ हे वाक्य ठरलेलं असतं. माहेर-सासर, पाहुणे, मुलं, पती, नातेवाईक या सर्वांना सांभाळताना होणारी कसरत आणि त्यातून येणाऱ्या अपमानास्पद प्रसंगामुळे जगणं संपविण्याचा विचार महिला करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
साताऱ्यात महिलांचे आत्महत्येचे प्रमाण काही दिवसांत वाढले आहे. लग्नानंतर महिलांची अवस्था कुंपणावर असलेल्या दोडक्यासारखी होते, असे काहींचे म्हणणे आहे. कोणतीही अडचण आली की माहेरचे लोक सासरकडे आणि सासरचे माहेराकडे बोट करतात, असे महिला सांगतात.
बºयाचदा मुलीचा संसार वाचविण्यासाठी माहेरचे लोकही सासरच्या मंडळींपुढे मुलींना दोषी ठरवतात, हे धक्कादायक वास्तव काही प्रकरणांमध्ये समोर आले आहे.
‘तुला सांभाळायला काही नाही; पण जग नावे ठेवायलाच बसलाय, जगासाठी आपला संसार टिकवला

पाहिजे, सगळ्याच बायकांना त्रास होतो, म्हणून काय त्या येतात का तुझ्यासारखं पळून,’ ही वाक्ये महिलांना सरावाची झाली आहेत.
उठता बसता घरातून होणारी शेरेबाजी, मानापमानाच्या गोष्टी, कामात उशीर म्हणून ओरड, मद्यपी पतीकडून होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास अशी एक ना अनेक कारणे महिलांचे मानसिक खच्चीकरण करत असतात. मात्र, सासरच्या लोकांनी कितीही मानहानीकारकपणे वागणूक दिली तरीही ‘सहन कर’ हे ब्रह्मवाक्य ज्यांना सोसवत नाही, त्या मृत्यूला कवटाळणं पसंत करतात.
महिलांची नैसर्गिक रचना मृदू आहे. मात्र, आत्महत्या करताना ती भलतीच कठोर होते. स्वयंपाक करताना बसलेला छोटा चटका किती वेदनादायी आहे, हे माहीत असूनही ती रॉकेल टाकून स्वत:ला पेटवते. तिचे ही कृत्य तिच्यातील मनस्ताप व्यक्त करणारे आहे. आगीच्या ज्वाळेत स्वत:ला झोकून देण्यासाठी लागणारं धाडस तिला हतबलतेतून येत
असते.
आपल्या भविष्याची सुंदर स्वप्न ज्या मुलांच्या रुपाने महिलांच्या आयुष्यात अवतरलेली असतात, त्यांनाही आपल्या पश्चात कोण सांभाळणार, आपण असताना त्यांना कोणी नीट बघितले नाही, मग आपल्या पश्चात कोण बघेल हा विचार करून कठोर आई बनून महिला आत्महत्या करताना मुलांनाही सोबत घेतल्याचे दिसत आहे. या घटना
समोर आल्यानंतर मन सुन्न
होतं.

आत्महत्यापूर्वी लक्षणे
पुरुषांसारखं महिला कोणतीच भावना मनात ठेवत नाहीत. घरात होणाºया त्रासाविषयी महिला माहेरी सांगतात. अनेकदा माहेरच्या माणसांनाही त्या आत्महत्या करावीशी वाटते, हे बोलून दाखवतात. पण नैराश्यातून आलेले हे वाक्य असल्याचा कुटुंबीयांचा कयास असतो. शेजारी, जवळचे नातेवाईक, पालक यांच्यापेक्षाही महिलांना त्यांचा भाऊ आणि वहिनी अधिक जवळ वाटतात. त्यांच्याशी बोलताना त्या मनातील भावना व्यक्त करतात. पण दुर्दैवाने त्याकडे गांभीर्याने बघितले नाही. नोकरी करणारी महिला असेल तर सहकाºयांशी याविषयावर बोलते.

साताऱ्यातील काही उदाहरणे
कोरेगाव येथील एका विवाहितेने पती बाहेरगावी गेल्यानंतर आपल्या दीड महिन्याच्या मुलीसह बाथरूममध्ये जाऊन पेटवून घेतले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने त्याविषयीचा मेसेज भावाला केला होता.
कºहाड तालुक्यातील एक विवाहिता आपल्या नऊ वर्षांच्या मुलीबरोबर आपल्या काही नातेवाइकांना भेटली. त्यानंतर घरी परतताना तिने तिच्या मुलीसह स्वत:ला गळफास घेतला आणि मृत्यूला कवटाळले.


ही काही कारणे

माहेरच्या माणसांवरून होणारी मानहानीकारक टिप्पणी
सण समारंभ आणि लग्नात न झालेले मानपान यामुळे शेरेबाजी,
पतीचा संशयी स्वभाव,
या जगात आपले कोणीच नाही ही असुरक्षिततेची भावना,
सारखी तडजोड मीच करायची ही हतबलता!
 

Web Title: Woman's breasts for women's life are: Desperation of marriages: Every act of deliberate acts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.