खटावमध्ये महिला उन्हाळी पदार्थ बनविण्यात व्यस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:39 AM2021-04-22T04:39:46+5:302021-04-22T04:39:46+5:30

खटाव : सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्षभर लागणारे उन्हाळी पदार्थ करण्यात व्यस्त आहेत. ...

Women busy making summer food in Khatav! | खटावमध्ये महिला उन्हाळी पदार्थ बनविण्यात व्यस्त!

खटावमध्ये महिला उन्हाळी पदार्थ बनविण्यात व्यस्त!

googlenewsNext

खटाव : सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्षभर लागणारे उन्हाळी पदार्थ करण्यात व्यस्त आहेत. त्यामध्ये शेवया, पापड, कुरडया, सांडगे, वेफर्स, खरुड्या, उपवासाचे साबुदाणा पापड आदी वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठीची गडबड सर्वत्र दिसून येत आहे.

सध्या लॉकडाऊन तसेच संचारबंदी सुरू असल्याने बहुतांश घरात तरुणाई तसेच कुटुंबप्रमुख पुरुष मंडळी घरातच असल्यामुळे टाईमपास म्हणून घरातील महिलांना या उन्हाळी कामात हातभार लावताना पाहावयास मिळत आहेत.

उन्हाळी वाळवण म्हणजे आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची खरी ओळख. आज भलेही ‘रेडी टू कुक तसेच रेडी टू इट’चा जमाना असला तरी, तयार लोणची, पापड तसेच रेडिमेड उन्हाळी कामे मिळत असली तरी, या धकाधकीच्या जीवनात देखील हौसेखातर मोकळ्या वेळेत थोड्या प्रमाणात का होईना हे पदार्थ घरी करण्याचा अट्टाहास गृहिणींचा असतो. उन्हाळी वाळवण ही वर्षभर टिकणारी गोष्ट असल्यामुळे ग्रामीण भागात सणासुदीला तळणाचा बेत ताटात असतोच. ग्रामीण भागातील महिलांनी आजही ही परंपरा जपली आहे. एकमेकांच्या मदतीने अंगणात उन्हाच्या आधी ही कामे उरकत असताना महिला सोशल डिस्टन्सिंग ठेवून कोरोनाच्या नियमांचे पालन करत आहेत, तर काही ठिकाणी उन्हाळी कामाची लगबग तसेच ही कामे करताना महिलांचा व्हिडिओ करून टिकटॉक करण्यात घरातील तरुणाई व्यस्त दिसून येत आहे.

२१खटाव

कॅप्शन :

वर्षभर टिकणाऱ्या उन्हाळी वाळवण कामाची ग्रामीण भागात लगबग सुरू आहे.

Web Title: Women busy making summer food in Khatav!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.